जाणून घ्या ‘अग्गबाई सूनबाई’ मधील शुभ्रा म्हणजेच उमा पेंढारकरबद्दल या खास गोष्टी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 5:34 PM1 / 7झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्याऐवजी प्रेक्षकांना अग्गंबाई सूनबाई ही नवी मालिका पाहायला मिळत आहे. 2 / 7अग्गबाई सूनबाई या मालिकेत ‘शुभ्रा’ च्या भूमिकेत काहींसाठी परिचयाचा तर काहींसाठी नवखा वाटणारा उमा पेंढारकर हा चेहेरा दिसत आहे. 3 / 7मुळात एक काऊंसिलर असलेल्या उमाचा अग्गबाई सूनबाई पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.4 / 7डोंबिवलीकर उमानं ज्योती शिधये यांच्याकडून कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं. 5 / 7 अद्वैत दादरकारचे आई-बाबा शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे तिनं नाट्यसंगीताचा डिप्लोमा केला. त्यात ती पहिली आली. 6 / 7 प्रशांत दामलेंकडून उमाला हा पुरस्कार मिळाला. आणि तोच क्षण उमाला रंगभूमीवर आणण्यासाठी पुरेसा ठरला तिला ‘संगीत संशय कल्लोळ’ हे नाटक मिळालं.7 / 7याखेरीज सायकॉलॉजीमध्ये उमानं मास्टर्स केलं आहे. त्यामुळे ती काउंसिलिंगचं काम मोठया जबाबदारीनं करते. आणखी वाचा Subscribe to Notifications