Join us

Urfi Javed Mother: उर्फी जावेदपेक्षाही सुंदर आहे तिची आई, ग्लॅमरच्या बाबतीत लेकीला देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 5:03 PM

1 / 10
उर्फी जावेद हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या प्रत्येकाला उर्फी जावेद हे नाव चांगलंच ठाऊक आहे. सध्या मात्र तिच्या आईची चर्चा आहे.
2 / 10
होय, उर्फीची आई सुद्धा सौंदर्याच्या बाबतीत लेकीपेक्षा कमी नाही. उर्फीच्या आईचं नाव झाकिया सुलताना आहे.
3 / 10
उर्फी इतकीच तिची आई झाकिया ही देखील सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव आहे. त्या देखील रोज नवे फोटो शेअर करत असतात.
4 / 10
झाकिया अनेकदा मुलींसोबत त्यांचे फोटो शेअर करत असतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर १० हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत.
5 / 10
झाकिया यांचे फोटो आणि ड्रेसिंग स्टाइल पाहून त्या पाच मुलांच्या आई आहेत, यावर विश्वास बसत नाही. त्यांच्या लांबसडक केसांचे नेटकरी अनेकदा कौतुक करतात.
6 / 10
झाकिया यांना उर्फीसह पाच मुलं आहेत. त्या आपल्या मुलींसोबत मुंबईत राहतात. त्यांच्या फ़ोटोंवरही नेटकरी लाइक आणि कमेंटचा वर्षाव करतात.
7 / 10
झाकिया या वयातही उर्फीला टक्कर देतात. त्यांचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो. उर्फीमुळे त्यांना अनेकदा ट्रोलही व्हावं लागलं आहे. मात्र त्या यावर कधीही रिॲक्ट झाल्या नाहीत.
8 / 10
उर्फी जावेद तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. तिचे बोल्ड कपडे, तिची स्टाइल स्टेटमेंट सगळंच अतरंगी.
9 / 10
अनेकदा तिला या कपड्यांमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण उर्फीला त्याची पर्वा नाही. अलीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता.
10 / 10
उर्फी व चित्रा वाघ यांचं प्रकरण अजूनही सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावर आत्तापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
टॅग्स :उर्फी जावेद