बाबो 25 किलोचा लेहंगा घालून शूटदरम्यानच धावत सुटली अभिनेत्री, कारण वाचून व्हाल हैराण By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 4:40 PM1 / 13मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना रिया ही नववधूच्या वेशात पाहायला मिळेल. 2 / 13तिचे लग्न रणबीरबरोबर होणार आहे. सर्वच नववधूंप्रमाणे तिने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. 3 / 13मात्र या लेहेंग्याचे वजन तब्बल 25 किलो होते आणि एका प्रसंगासाठी हा भारी वजनाचा लेहेंगा परिधान करुन तिला धावायचे होते. 4 / 13या प्रसंगाच्या चित्रीकरणानंतर पूजाकडे पाहिल्यावर कोणालाही वाटले असते की दिवसभर चित्रीकरण केल्यामुळे ती दमली आहे. 5 / 13अर्थात तिच्याऐवजी बॉडी डबल वापरून वधावण्याचा हा प्रसंग साकारता आला असता, पण पूजाला हा प्रसंग अस्सल रंगवायचा असल्याने तिने स्वत:च या भरजरी लेहंग्यात धावण्याचा प्रसंग चित्रीत केला.6 / 13‘कुमकुम भाग्य’मध्ये रियाची भूमिका साकारणारी पूजा बॅनर्जीने हा अवजड पोशाख घालून धावताना येणा-या अडचणींबद्दल सांगितले.7 / 13या लग्नाच्या प्रसंगासाठी मला नववधूचा पोशाख परिधान करायचा होता. हा लालभडक रंगाचा सुंदर डिझायनर लेहेंगा परिधान करताना मला खूप आनंद झाला.8 / 13पण हा जड लेहेंगा घालून मला पळावं लागणार होतं. ती गोष्ट फारच कठीण होती. खरं सांगायचं, तर हा लेहेंगा खरंच खूप जड होता. त्याचं वजन जवळपास 25 किलो होतं.9 / 13 त्याशिवाय मी लग्नाचे दागदागिने घातले होते. या प्रसंगाचं चित्रीकरण दोन-तीन दिवस सुरू होतं. तेव्हा मला दररोज दोन-तीन तास या नववधूच्या रूपात सजण्यासाठी घालवावे लागत होते. 10 / 13कुमकुम भाग्यच्या सेटवर जाण्यासाठी पायर-या चढणं आणि नंतर काही प्रसंगासाठी या वेशात धावणं हे मोठं कठीण काम होतं. 11 / 13पण मला हा प्रसंग परफेक्ट झाला पाहिजे असं वाटत होतं आणि म्हणून मीच त्याचं चित्रीकरण केलं. पण माझे सारे कष्ट सार्थकी लागले. 12 / 13मला तो लेहंगा घालून वावरणं खूप छान वाटत होतं. लग्नाच्या या सा-या प्रसंगाचं चित्रीकरण करताना खूप मजा आली. 13 / 13 आणखी वाचा Subscribe to Notifications