कोण होतीस तू, काय झालीस तू..., उर्फी जावेदला 'डर्टी' लूकमध्ये ओळखणं झालंय कठीण By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 3:48 PM1 / 10टेलिव्हिजनवरील अभिनेत्री उर्फी जावेद चित्रविचित्र फॅशनमुळे सातत्याने चर्चेत येत असते. सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि तिचे विचित्र कपडे हे जणू समीकरणच झाले आहे.2 / 10अंग झाकलेले, जरा बरे कपडे उर्फीने घातले तर नवलच. तिला कितीही ट्रोल केले तरी फरक पडत नाही उलट ती हवे तसेच कपडे घालते.3 / 10तिची फॅशन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिने डर्टी लिहिलेलं ब्रालेट टॉप परिधान केले आहे.4 / 10यावेळी तिच्या टॉपपेक्षा आयब्रोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अतरंगी फॅशनच्या नावावर चक्क आयब्रो गायब करुन टाकले आहेत.5 / 10उर्फी जावेदचे बरेच व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये उर्फीने डर्टी वर्डचा ब्रालेट घातली आहे. 6 / 10तसेच, तिने भडक मेकअपसोबत केसांचे दोन बो बांधले आहेत. परंतु उर्फी जावेदच्या आउटफिटपेक्षा तिच्या भुवयांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.7 / 10उर्फीने भुवयांना ब्लीच केले आहे. उर्फीचा हा चित्रविचित्र लूक सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.8 / 10उर्फी जावेद कधीकधी कपड्यांवर कात्री चालवते आणि कचर्याच्या पिशव्यांचे कपडे बनवते. या सर्व गोष्टी सामान्य आहेत, ड्रेसिंगशिवाय अंग झाकण्यासाठी ती घड्याळ आणि वृत्तपत्राचाही वापर करता दिसली आहे. मात्र यावेळी हटके करण्याच्या नादात तिने आयब्रो गायब केले आहेत.9 / 10उर्फी जावेद टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. 10 / 10उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र आठव्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. आणखी वाचा Subscribe to Notifications