मोहितची रिअल लाइफ स्वीटू आहे तितकीच गोड आणि सुंदर; पाहा कोण आहे त्याची पत्नी By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 1:00 PM1 / 9छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका म्हणजे 'येऊ कशी तशी मी नांदायला'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.2 / 9या मालिकेत मालविकासोबत खलनायकाची भूमिका साकारणारा मोहितदेखील लोकप्रिय ठरला. मोहितची भूमिका अभिनेता निखील राऊत (Nikhil Raut) याने साकारली आहे.3 / 9खानविलकरांची संपत्ती मिळावी यासाठी स्वीटूसोबत लग्न करणाऱ्या मोहितची रिअल लाइफ स्वीटूदेखील तितकीच सुंदर आणि साधी आहे. 4 / 9सध्या सोशल मीडियावर निखीलच्या रिअल लाइफ स्वीटूबद्दल चर्चा होत आहे. निखीलची खऱ्या आयुष्यातली पत्नी कोण? ती कशी दिसते याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.5 / 9निखीलच्या पत्नीचं नाव मयुरी राऊत असं असून ती उत्तम नृत्यांगना आहे.6 / 9सोशल मीडियावर सक्रीय असलेली मयुरी अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते. 7 / 9२२ एप्रिल २०१४ रोजी निखिलने मयुरीशी लग्नगाठ बांधली. मयुरी एक शास्त्रीय नृत्यांगना आहे. 8 / 9निखील अनेकदा सोशल मीडियावर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो.9 / 9निखीलने त्याच्या पत्नीसाठी खास बर्थ डे सेलिब्रेशन केलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications