Amala Paul: मंदिरात प्रवेश नाकारल्याने अभिनेत्री संतप्त, लांबूनच घेतले दर्शन; व्यक्त केली भावना By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 6:44 PM1 / 10 दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री अमला पॉल हिचा चेहरा जरी मराठीभाषिकांना परिचीत नसला तरी तिचं नाव नक्कीच तुम्हाला माहिती आहे. 2 / 10दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी ती एक आहे. तिच्या चित्रपटांमुळे ती नेहमीच वादाच्या भोवऱ्याच अडकते. मात्र, आता तिने केलेल्या विधानामुळे वेगळाच वाद समोर आला आहे. 3 / 10 केरळमधील एका हिंदू मंदिरात अमलाला प्रवेश नाकारण्यात आला असून सोमवारी ही घटना घडली. याबद्दल तिने खेद व्यक्त केला आहे. अमलाने मंदिर प्रशासनावर आरोप करत धार्मिक भेदभाव झाल्याचं म्हटलं आहे. 4 / 10आरोप करत अमला म्हणाली की, धार्मिक भेदभावामुळे तिला केरळमधील एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेवाच्या मंदिरात प्रवेश करण्यापासून अधिकाऱ्यांनी रोखले होते. 5 / 10अमलाने मंदिरात प्रवेश केला तर सगळ्या प्रथांचे उल्लंघन होईल आणि त्यामुळे या मंदिरात फक्त हिंदूनाच प्रवेश मिळेल, असे मंदिर प्रशासनाने म्हणणे होते, असे अमलाने म्हटले आहे. 6 / 10येथील मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे तिला फक्त रस्त्यावरूनच देवींचे दर्शन घ्यावे लागले. अमलाने मंदिरातील व्हिजिटर्स रजिस्टरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 7 / 10‘हे दुःखद आणि निराशाजनक आहे की 2023 मध्ये धार्मिक भेदभाव अजूनही अस्तित्वात आहे. मी देवीच्या जवळ जाऊ शकत नव्हते, पण लांबून दर्शन घेऊनही तिची अनुभूती येत होती. 8 / 10मला आशा आहे की धार्मिक भेदभावात लवकरच बदल होतील आणि अशी वेळ नक्कीच येईल, जेव्हा धर्माच्या आधारावर नव्हे तर आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाईल. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 9 / 10दरम्यान, न्यूज 18 मल्याळच्या वृत्तानुसार, मंदिर ट्रस्ट फक्त विद्यमान प्रोटोकॉलचे पालन करत आहे. 'अन्य अनेक धर्मातील भाविक मंदिरात दर्शनासाठी आले आहेत, परंतु हे कोणालाच माहीत नाही. मात्र, जेव्हा एखादी सेलिब्रिटी येते तेव्हा ते वादग्रस्त ठरते.', असे मंदिर ट्रस्टचे सचिव प्रसून कुमार म्हणाले, 10 / 10अमला पॉलच्या या आरोपामुळे सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. तसेच, कुठल्याही मंदिरात धार्मिक भेदभाव केला जाऊ नये, अशी भावनाही काहींनी व्यक्त केली आहे आणखी वाचा Subscribe to Notifications