वैवाहिक जीवन सोडून, संसार मोडून सिनेजगतात आल्या या अभिनेत्री, दिले एकापेक्षा एक बोल्ड सीन By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 7:14 PM1 / 62 / 6बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया हिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. त्यांनी बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्नासोबत विवाह केल्यानंतर चित्रपट सृष्टी सोडली होती. मात्र १९८२ मध्ये त्यांनी राजेश खन्ना यांना सोडल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. 3 / 6बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिचं नावही या यादीमध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच विवाह केला होता. तिने बालपणीचा मित्र गोल्फर ज्योती रंधावा याच्याशी विवाह केला होता. चित्रांगदाने विवाहानंतर कुटुंबासोबत राहावं, असं ज्योतीला वाटत असे. मात्र चित्रांगदाला चित्रपटांमध्ये करिअर बनवायचं होतं. त्यामुळे तिने २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. 4 / 6इम्रान हाश्मीचा चित्रपट मर्डरमधून बोल्डसीनमधून सर्वांना घायाळ करणाऱ्या मल्लिका शेरावतचं नाव हॉट भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांनी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी विवाहा केला होता. मात्र तिचे पती करण गिल यांचा तिच्या चित्रपटामध्ये काम करण्याला विरोध होता. त्यामुळे ती पतीपासून वेगळी झाली. 5 / 6बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीचं नाव या यादीमध्ये पाहून तुम्हाला धक्का बसेल. पण तिनं २००६ मध्ये विवाह केला होता. मात्र एका वर्षाच्या आतच त्यांचा घटस्फोट झाला. विवाहानंतर २००८ मध्ये तिने दिल्ली ६ चित्रपटापासून अभिनयाला सुरुवात केली. 6 / 6या लिस्टमध्ये अनुराग कश्यपचा चित्रपट देव डी चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या माही गिल हिचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिनेही करिअरची सुरुवात करण्यापूर्वी लग्न केलं होतं. मात्र तिचाही लवकरच घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती सिनेजगतात आली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications