रॉक कॉन्सर्टमध्ये भेट; ३ वर्ष डेटिंग, लग्न; अशी आहे Pallavi Joshi आणि Vivek Agnihotri यांची लव्हस्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 9:40 AM1 / 8Pallavi Joshi-Vivek Aganihotri Love Story : सध्या बॉक्स ऑफिसवर एका चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे. विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटात पल्लवी जोशी यांनीदेखील भूमिका साकारली आहे. परंतु खऱ्या आयुष्यात पती पत्नी असलेल्या पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांची लव्हस्टोरी कशी होती हे माहितीये?2 / 8पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांची भेट एका रॉक कॉन्सर्टमध्ये झाली. परंतु पहिल्या भेटीत पल्लवी जोशी यांना विवेक अग्निहोत्री तितके आवडले नव्हते. त्यांना विवेक अग्निहोत्री हे अॅरोगंट वाटले होते.3 / 84 / 8'मला तहान लागली होती आणि विवेक यांनी मला काही पिण्यासाठई आणून दिलं. पहिल्या भेटीतल मला ते खास काही आवडले नव्हते. तेव्हा ते 'अॅड मॅन' होते, मला ते अॅरोगंट आहेत असं वाटत होतं,' असं पल्लवी जोशींनी सांगितलं.5 / 8नंतर कालांतरानं दोघांमधील अंतर कमी होत गेलं आणि पर्सनल, तसंच प्रोफेशनल लेव्हलला दोघंही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखू लागले. त्यानंतर दोघांनी ३ वर्ष एकमेकांना डेट केलं. यानंतर २८ जून १९९७ रोजी दोघांनी मुंबईत विवाह केला. पल्लवी जोशी आणि विवके अग्निहोत्री यांना दोन अपत्ये आहेत.6 / 8या दोघांनीही अनेक प्रोजेक्ट्समध्ये सोबत काम केलं आहे. एकत्र काम केल्यानं दोघांमधील बॉडिंग स्ट्राँग झाल्याचं विवेक अग्निहोत्री सांगतात. एकत्र काम केल्यानं आमच्या वैवाहिक जीवनातही सकारात्मक परिणाम झाला. आम्ही एकमेकांच्या प्रोफेशनल क्षमतेचा आदर करतो, असंही ते म्हणाले. 7 / 8विवेक आणि पल्लवी यांचं नातं पती पत्नीपेक्षाही अधिक मैत्रीचं आहे. वैवाहिक जीवनात मैत्रीही खुप काही असतं असं ते मानतात. दोघांमध्ये मैत्री नसेल तर लग्न क्लिनिकल होऊन जातं, असंही त्यांचं म्हणणं आहे.8 / 8द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाच्या निमित्तानं पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा एकत्र काम केलं. पल्लवी जोशी या चित्रपटाच्या प्रोड्युसर आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications