Join us

'सहजीवनाचा शेवट नाही, ही तर नवीन सुरुवात'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 2:17 PM

1 / 14
बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. नुकतेच बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात आला आहे.
2 / 14
दोघांनी एकमेकांच्या समहमतीने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. दोघांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे.
3 / 14
आमीर आणि किरण या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री होती. एक कपल म्हणून सा-यांचे ते फेव्हरेट बनले होते. घटस्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे कारण समोर आलेले नाही.
4 / 14
किरण रावसह आमीर खानचे दुसरे लग्न होते, घटस्फोट झाला असला तरी मुलाची काळजी दोघेही घेत राहतील. आयुष्याची नवीन सुरुवात करत आहोत. दोघेही आता पती पत्नीसारखे राहत नसलो तरी मैत्री कायम राहिल असे आमिर खानने सांगितले आहे.
5 / 14
'आम्ही आमच्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे, त्यांनी आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानतो. आमच्या प्रमाणेच, आमच्या हितचिंतकांनीही या घटस्फोटाकडे सहजीवनाचा शेवट झाला अशा अर्थाने पाहू नये. ही एक नवीन सुरुवात आहे असाच अर्थ घ्यावा.', असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
6 / 14
एका मुलाखतीत आमीर खानने सांगितले होते की, मी जेव्हा 'लगान' सिनेमा करत होतो तेव्हा किरणसोबत भेट झाली होती. ती असिस्टंट डायरेक्टरपैकी एक होती. त्यावेळी आमच्यात काहीच नातं नव्हतं. आमची मैत्रीपण झाली नव्हती. ती यूनिटचा भाग होती. माझ्या घटस्फोटानंतर काही काळाने मी तिला पुन्हा भेटलो.
7 / 14
ट्रॉमाच्या त्या फेजमध्ये तिचा फोन आला होता आणि मी तिच्यासोबत अर्धा तास बोललो. जेव्हा मी फोन ठेवला तेव्हा मी म्हणालो 'My God! जेव्हा मी तिच्यासोबत बोलतो तेव्हा मला फार आनंद होतो'. त्यानंतर आम्ही डेटींग सुरू केलं. लग्नाआधी आम्ही दीड वर्षे सोबत होतो.
8 / 14
दरम्यान २००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. प्रोफेशनल लाइफबाबत सांगायचं तर किरण सिने निर्माती, स्क्रीनरायटर आणि दिग्दर्शक आहे. तिने जाने तू या जाने ना, धोबी घाट, दंगल, तलाश, सीक्रेट सुपरस्टार, पीपली लाइव्हसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे.
9 / 14
महाराष्ट्रात दुष्काळानं थैमान घातलं होतं. करपलेली पिकं, कोरडा दुष्काळ, पिण्यासही पाणी नाही अशा विविध समस्यांचा सामना राज्यातील जनतेला करावा लागत होता. अभिनेता अमीर खान आणि किरण राव यांनी हीच समस्या ओळखून या क्षेत्रात काम करायचं ठरवलं.
10 / 14
यासाठी अमीर खाननं राज्यातील गावोगावी जाऊन गावकऱ्यांना एकत्रित करून बदल घडवून आणण्याचा चमत्कार केला. पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून अमीर खान, किरण राव यांच्या टीमने राज्यात जलक्रांती घडवण्याचं काम हाती घेतलं. लोकं मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन एक चळवळ उभी राहिली.
11 / 14
पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून झालेल्या या कामामुळे गेल्या ४ वर्षात सत्यमेव जयते स्पर्धेत सहभागी असणाऱ्या गावकऱ्यांच्या सहकार्याने राज्यात ५५० अब्ज लीटर क्षमतेचा पाणीसाठा तयार होऊ शकला. पानी फाऊंडेशनतर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक सहभागी स्पर्धक गावाने ५ गावकऱ्यांना पाठवले जात होते.
12 / 14
मात्र अमीर खानने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, काही दिवसांपासून आम्ही वेगळे होण्याचा विचार करत होतो. पण आता ती वेळ आली आहे.
13 / 14
आम्ही नवरा-बायको म्हणून वेगळं होतोय. परंतु आमचं वैवाहिक नातं संपुष्टात आलं असलं तरी व्यावसायिक नातं कायम आहे. फिल्म, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांवर आम्ही एकत्र काम करणार आहोत असं त्याने स्पष्ट सांगितले आहे.
14 / 14
ही नवीन सुरुवात असल्याचे दोघांनीही संयुक्त निवेदनात म्हटलंय.
टॅग्स :आमिर खानकिरण रावमुंबईघटस्फोट