Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रींनी बांधलीय पडद्यामागच्या कलाकारांशी लग्नगाठ, पाहा कोण आहेत त्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 07:00 IST

1 / 7
या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते मागील वर्षीच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री हृता दुर्गुळेचं. हृतानं मागच्याच वर्षी दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत लग्नगाठ बांधली. अचानक लग्न करत तिने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. प्रतिक हा हिंदी मालिकांचा दिग्दर्शक आहे.
2 / 7
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. २०१७ साली प्रार्थनाने लग्न केले. लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता अभिषेक जावकर याच्याशी तिने गोव्यात अगदी थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. प्रार्थना अनेकदा अभिषेकला त्याच्या कामातही मदत करताना दिसते.
3 / 7
अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोलेने देखील दिग्दर्शक आणि निर्मात्याशी लग्न केले. सुहृद गोडबोले याच्याशी तिने २०११ मध्ये लग्न केले. सुहृद हा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते श्रीरंग गोडबोलेंचा मुलगा आहे. अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमध्ये गिरीजा आपल्याला दिसली होती.
4 / 7
अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनीही एका निर्मात्याशी लग्न केलंय. २००० साली त्यांनी अजय शर्मा यांच्याशी विवाह केला. वर्षा यांचे सासरे रवी शंकर शर्मा हे देखील एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहेत.
5 / 7
प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांचे पतीसुद्धा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. समीर आठल्ये यांच्याशी अलका यांनी विवाह केला होता. १९९२ मध्ये दोघांनीही लग्न केले होते. तर समीर यांनी आजवर अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांसाठी काम केलंय. तसेच अलका कुबल आणि समीर यांनी मिळून काही मालिका आणि चित्रपटांची निर्मितीही केलीय.
6 / 7
अभिनेत्री स्नेहलता वसईकरनेही दिग्दर्शकाशी लग्न केलंय. प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश वसईकरसोबत तिने विवाह केलाय. अनेक लोकप्रिय मालिका गिरीशने दिग्दर्शित केल्यात. ठिपक्यांची रांगोळी, फुलाला सुगंध मातीचा तसेच काही हिंदी मालिकांचही त्याने दिग्दर्शन केलंय.
7 / 7
पल्लवीच्या पतीचं नावं केदार वैद्य आहे. केदार एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. केदार वैद्य हे मराठी चित्रपट, मालिका दिग्दर्शक आहेत. माझ्या नवऱ्याची बायको, माझे पती सौभाग्यवती, झिपऱ्या या मालिका आणि चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. ‘अगंबाई अरेच्चा!’ या चित्रपटात त्यांनी सह- दिग्दर्शकाची भूमिका बजावली होती. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची व पल्लवीची मैत्री झाली होती. ही मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि नंतर दोघांनी लग्न केले.
टॅग्स :अलका कुबलवर्षा उसगांवकरगिरिजा ओकस्नेहलता वसईकरऋता दूर्गुळेप्रार्थना बेहरे