Join us  

हे बॉलीवूड स्टार्स इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी घेतात कोट्यवधी रूपये.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 4:39 PM

1 / 8
बॉलिवूड कलाकार बऱ्याच वेळा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. पण हेच कालाकार त्यांच्या इन्स्टाग्रावर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करण्यासाठी कोट्यावधी रुपये घेतात हे तुम्हाला माहिती आहे का? नुकताच हॉपर्स एचक्यू कंपनीने इंन्स्टाग्राम रिच लिस्ट २०१९ प्रदर्शित केली आहे. या यादीमध्ये बॉलिवूड कलाकार आणि त्यांची इन्स्टाग्रामच्या एका पोस्टची रक्कम सांगण्यात आली आहे.
2 / 8
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख एका पोस्टसाठी १ कोटी रुपये घेतो.
3 / 8
बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन ट्विटरवर जास्त सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. पण त्यांचे इन्स्टाग्रामवर देखील चाहते असल्याचे दिसते. अमिताभ बच्चन इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी ४०-४५ लाख रुपये घेत असल्याचे समोर आले आहे.
4 / 8
अभिनेत्री आलिया भट्ट एका इन्स्टापोस्टसाठी १ कोटी रुपये घेते.
5 / 8
बॉलिवूडची देसी गर्स प्रियांका चोप्रा इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही जास्त पैसे घेते. ती जवळपास १ कोटी ८७ लाख रुपये घेत असल्याचे म्हटले जाते.
6 / 8
सोनाक्षी सिन्हा १ पोस्टसाठी ५ लाख रुपये घेते.
7 / 8
तर शाहिद कपूर एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी २० ते ३० लाख रुपये घेतो.
8 / 8
नेहा एका पोस्टसाठी १ लाख ५० हजार रुपये घेते.
टॅग्स :बॉलिवूडप्रियंका चोप्रासोनाक्षी सिन्हाआलिया भट