‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील हा प्रसिद्ध अभिनेता आजही राहतो चाळीत, Video शेअर करत म्हणाला- सुख असो, दुःख.... By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 7:00 AM1 / 10'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमानने रसिकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. (Photo Instagram)2 / 10ही हास्यजत्रा सगळ्यांच्या टेन्शनवरची मात्रा ठरली आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाच्या बाबतीत हास्यजत्रा नेहमीच नशीबवान ठरली आहे.(Photo Instagram)3 / 10'महाराष्ट्राची हास्यजत्रा'तील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसतो. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे निखिल बने. . (Photo Instagram)4 / 10‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे निखिल बने हे नाव घराघरात पोहोचले. या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीस आलेला निखिल अजूनही चाळीत राहतो. (Photo Instagram)5 / 10निखिलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घराचे व्हिडीओ शेअर केला आहे. (Photo Instagram)6 / 10निखिलने त्याच्या घरात रिनोव्हेशनचं काम केलं आहे. पूर्वी आपलं घर कसं होतं आणि आता कसं आहे हे त्याने व्हि़डीओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. (Photo Instagram)7 / 10. “चाळीत एकत्र राहण्याची हिच खरी मज्जा आहे. सुख असो, दुःख असो किंवा काहीही मदत असो सगळे धावून येतात.असे कॅप्शन त्याने या व्हि़डीओला दिलं आहे. (Photo Instagram)8 / 10आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत भाग घेत निखिलनं त्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यानं छोटी-मोठी कामं केली. (Photo Instagram)9 / 10एकांकिका, हास्यजत्रा बॅक स्टेज ते छोट्या भूमिका आणि आता विनोदवीर अशी यशाची प्रत्येक पायरी निखिलनं जोमानं आणि जिद्दीनं पार केलीय(Photo Instagram)10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications