ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे मकरंद अनासपुरेंची पत्नी, सेटवरच जुळली होती रेशीमगाठ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:43 IST
1 / 12अभिनेता मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वात वास्तव, वजुद, यशवंत, प्राण जाये पर शान ना जाये, माय फ्रेंड गणेश या चित्रपटातदेखील काम केले आहे. 2 / 12मकरंद अनासपुरे यांनी ‘डॅम्बीस’ या चित्रपटाचे पटकथालेखन, दिग्दर्शन व निर्मिती देखील केली आहे. 3 / 12बऱ्याच लोकांना माहित नाही की मकरंद अनासपुरे यांची पत्नी शिल्पा अनासपुरे देखील अभिनेत्री आहेत. मात्र सध्या त्या सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे.4 / 12मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचे लव्ह मॅरिज आहे. शिल्पा मुळच्या मुंबईच्या असून त्यांनी नाटक आणि चित्रपटातून काम केले आहेत. 5 / 12२००० साली 'जाऊ बाई जोरात' या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पा आणि मकरंद यांची भेट झाली होती. याचकाळात मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या होत्या आणि त्यांनी लग्नाची मागणी घातली. 6 / 12शिल्पा यांचा होकार मिळताच दोघांनी त्यांच्या घरी याबद्दल सांगितले. विशेष म्हणजे दोघांचे हे आंतरजातीय विवाह आहे. तसा दोघांच्या घरातून विरोध झाला नाही.7 / 12सुरूवातीला मकरंद यांच्याकडे राहायला घरदेखील नव्हते. मकरंद शिल्पा यांना मागणी घालण्यासाठी त्यांच्या घरी गेले. ते त्यांच्या वडिलांशी बोलले. 8 / 12सगळे बोलणे झाल्यानंतर शिल्पा यांचे वडील आपल्याच मुलीला म्हणाले, 'शिल्पा मुलगा खूप चांगला वाटला. तो तुला खूप सांभाळून घेईल. तू त्याला सांभाळून घेऊ शकणार नाहीस. फार फार तर तू दोन महिने त्याच्यासोबत राहशील. नंतर तू परत येशील.'9 / 12ते पुढे म्हणाले, 'सुरुवातीला प्रेमापोटी तू म्हणशील की हा मी खुश आहे. पण नंतर तू त्याला म्हणशील की माझ्या घरी तर असे होते, तसे होते. त्याच्या डोक्याला ताप होईल. तुला नाही जमणार हे.' मात्र त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाच.10 / 12 ३० नोव्हेंबर २००१ रोजी औरंगाबादमध्ये दोघांचे लग्न झाले. लग्न झाल्यावर मकरंद यांनी ठाण्यातील वर्तकनगरमधील एक खोली भाड्याने घेतली. आई- वडिलांकडे फ्लॅटमध्ये राहणारी शिल्पा लग्नानंतर छोट्याश्या खोलीत राहायला आली. नंतर त्यांनी स्वतःचे घर घेतले.11 / 12लग्नानंतर शिल्पा यांनी काही चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्यासोबत चित्रपटात काम केले. एक दोन नव्हे तर तब्बल ५ चित्रपटात ते एकत्र झळकले आहेत. कापूस कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, सुंबरान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केली आहेत.12 / 12मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर चालवत असलेल्या नाम फाउंडेशनच्या कार्यात देखील शिल्पा यांचा मोलाचा वाटा आहे. मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.