मानसी-तेजसची लग्नानंतरची पहिली संक्रांत, 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेच्या विशेष भागाची खास झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 16:15 IST
1 / 7 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका स्टार प्रवाहवर चर्चेत आहे. या मालिकेत मानसी-तेजसची लग्नानंतरची पहिली संक्रांत रंगणार आहे2 / 7या विशेष भागाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीय. यात मानसी वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन संक्रांत साजरी करणार आहे3 / 7मानसी-तेजसने संक्रांतीसाठी एकमेकांना साजेसे कपडे परिधान केलेले दिसून येत आहेत. याशिवाय मानसीने हलव्यांचे दागिनेही चढवले आहेत4 / 7मानसी-तेजसने संक्रांतीनिमित्त खास फोटोशूटही केलेलं दिसतंय. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतील या जोडीला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली आहे5 / 7मानसीची भूमिका अभिनेत्री शिवानी सुर्वेने साकारली आहे. तेजसच्या भूमिकेत अभिनेता समीर परांजपे झळकताना दिसत आहे6 / 7'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका प्रोमोपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चेत होती. ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर बघायला मिळेल7 / 7'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतील मानसी-तेजस या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांचं मन जिंकून गेली. कौटुंबिक कथानकामुळे ही मालिका आज घराघरात पाहिली जाते