PHOTOS : ‘दगडू’च्या रिअल लाईफमध्ये ‘प्राजू’ची एन्ट्री? प्रथमेश परबच्या ‘त्या’ पोस्टची चर्चा भारी By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 12:35 PM1 / 10अरे हम गरीब हूए तो क्या हुआ, दिल से अमीर है... अमीर... हा डायलॉग आठवताच आठवतो तो ‘टाईमपास’मधला दगडू. हाच दगडू आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचा लाडका अभिनेता झाला आहे. आम्ही बोलतोय तो दगडूची भूमिका साकारणाऱ्या प्रथमेश परबबद्दल.2 / 10दगडूला लोकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं. त्याच्यासोबतच प्राजूने ही प्रेक्षकांच्या मनावर आपल्या भूमिकेचा ठसा उमटवला आहे.आता याच दगडूबद्दल एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. होय, दगडूला खºया आयुष्यातील ‘प्राजू’ मिळाल्याचं मानलं जातंय.3 / 10प्रथमेशच्या एका सोशल मीडिया पोस्टवरुन त्याच्या रियल लाईफमधील प्राजूची चर्चा रंगली आहे. दिवाळीनिमित्त प्रथमेशने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर काही फोटोशेअर केले आहेत. त्याच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.4 / 10प्रथमेशने अभिनेत्री क्षितिजा घोसाळकरसोबत दिवाळी साजरी करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दोघंही पारंपरिक लुकमध्ये आहेत. हे फोटो पाहून नेटकरी ‘सैराट’ झाले आहेत.5 / 10 दादूस आमची वहिनी काय? असा प्रश्न अनेकांनी प्रथमेशला विचारला आहे. प्रथमेशने शेअर केलेल्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रथमेश रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.6 / 10क्षितीजासोबतचे प्रथमेशचे हे पहिलेच फोटोशूट नाही, याआधी दोघांनी एकत्र फोटोशूट केलं आहे. पण हे फोटो जरा वेगळे आहेत. शिवाय ‘निमित्त जरी दिवाळीचं असलं तरीदेखील नात्यांचं साजरं होणं महत्त्वाचं’, असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यावरून चर्चेला उधाण आलं आहे.7 / 10 याआधी प्रथमेश व क्षितिजाने मकरसंक्रांतीनिमित्त असंच एक फोटोशूट केलं होतं. पण त्यावेळी दोघांच्या नात्यांची चर्चा नव्हती. पण आता दगडूला प्राजू मिळाल्याचं म्हटलं जात आहे.8 / 10 अद्याप प्रथमेश व क्षितिजा दोघांनीही या चर्चांवर काहीही उत्तर दिलेलं नाही. पण चाहत्यांनी मात्र दोघांना शुभेच्छा द्यायला सुरूवात केली आहे. 9 / 10प्रथमेशने आतापर्यंत अनेक हीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रथमेशने बालक-पालक, टाईमपास, टाईमपास 2, लालबागची राणी, उर्फी अशा अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केलं. या सिनेमांमुळे तो आता स्टार झाला आहे. ‘बालक-पालक’ या सिनेमातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. 10 / 10 कुटुंबात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना प्रथमेशनं आज उत्तम अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. मराठीसोबतच दृश्यम, खजूर पे अटके आणि अन्य या हिंदी चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications