Join us

Tina Dabi sister Ria Dabi: IAS टीना डाबीची बहिण रियादेखील दिसते तिच्याइतकीच सुंदर, तुम्हीही पाहा तिचे खास Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 4:20 PM

1 / 9
Tina Dabi sister Ria Dabi: UPSC च्या २०१६ बॅचमध्ये टॉपर असलेली IAS टीना डाबी आंतरधर्मीय लग्नाच्या मुद्द्यामुळे चर्चेत होती, पण त्यासोबत तिच्या सौंदर्यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग आहे. टीनाची लहान बहिण रियादेखील तिच्याइतकीच सुंदर दिसते.
2 / 9
टीनाची बहिण रिया डाबी ही देखील सौंदर्याच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींना टक्कर देईल अशी आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिला हजारो फॉलोअर्स पसंत करतात.
3 / 9
रियाचा जन्म भोपाळमध्ये झाला होता पण लहानपणापासून ती दिल्लीत राहत होती. तिचे वडील बीएसएनएलमध्ये अधिकारी होते आणि आई भारतीय अभियांत्रिकी सेवेत अधिकारी आहे. दिल्लीत राहणाऱ्या आई-वडिलांमुळे रियाने दिल्लीत शिक्षण पूर्ण केले.
4 / 9
रिया डाबीने २०२१ मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. तिने UPSC परीक्षेत भारतात १५ वा क्रमांक मिळविला. मोठी बहीण टीना डाबीनंतर धाकटी बहीण रिया IAS होताच प्रकाशझोतात आली.
5 / 9
रिया डाबीने शालेय जीवनात IAS होण्याचे स्वप्न पाहिले होते. तिची मोठी बहीण टीना डाबी UPSC टॉपर होती आणि रियाला तिच्यासारखे व्हायचे होते. तयारी सुरू करताना, रियाला माहित होते की ती UPSC परीक्षा उत्तीर्ण करेल परंतु तिला स्वतःला कल्पना नव्हती की ती टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवेल.
6 / 9
रियाची मोठी बहीण टीना हिने जयपूरमध्ये IAS प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न केले. टीनाच्या लग्नात रिया खूप सुंदर दिसत होती. लग्नानंतर रियाने इन्स्टाग्रामवर नव्या जोडप्यासोबतचे फोटो पोस्ट केले. त्या फोटोंना चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली.
7 / 9
रिया सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सचे आणि वैयक्तिक जीवनातील फोटोज पोस्ट करत असते. तिची सुंदर आणि साधी शैली चाहत्यांना खूप भावताना दिसते.
8 / 9
IAS रिया डाबीच्या इंस्टाग्राम पेजवर सध्या ४ लाख ५८ हजार फॉलोअर्स आहेत. ती मात्र मोजक्या ५७६ लोकांनाच फॉलो करते.
9 / 9
IAS रिया डाबी तिची बहीण टीनासारखी खूप सुंदर आहे. रियाने 2021 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली असून ती सध्या राजस्थान केडरची अधिकारी आहे. रिया डाबी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असते. (सर्व फोटो- रिया डाबी इन्स्टाग्राम)
टॅग्स :व्हायरल फोटोज्सोशल मीडियाइन्स्टाग्रामराजस्थान