Join us

Saisha Shinde : अंबानींच्या पार्टीत 'ट्रान्सवुमन' साईशा शिंदे घाबरली, पापाराझी म्हणाले, "कोई पहलवान..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 10:26 AM

1 / 9
नीता मुकेश अंबानी कल्चरल इव्हेंट काही दिवसांपूर्वीच मुंबईत पार पडला. यावेळी बॉलिवूड, हॉलिवूड आणि इतर क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी सर्वच फॅशनेबल स्टाईलमध्ये दिसले. दरम्यान ट्रान्सवुमन साईशा शिंदेकडे (Saisha Shinde) सर्वांच्याच नजरा वळल्या.
2 / 9
40 वर्षीय साईशा शिंदे प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.काही वर्षांपूर्वीच तिने ऑपरेशन केले आणि ती स्वप्नील शिंदे ची साईशा शिंदे बनली. हे बघून सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र इंडस्ट्रीतील अनेक जणांनी तिला पाठिंबा दिला.
3 / 9
नुकतीच ती अंबानींच्या या ग्रँड इव्हेंटमध्ये पोहोचली. यावेळी तिचं वजन वाढल्याचं दिसलं.साईशाने गडद हिरव्या रंगाचा स्किन टाईट शॉर्ट वनपीस आणि त्यावर पारंपारिक जॅकेट परिधान केलं होतं. तर गळ्यात मोठा हारही होता. साईशाचा लुक नेटकऱ्यांना काही आवडला नाही आणि ती ट्रोलही झाली.
4 / 9
साईशाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत इव्हेंटमधला धक्कादायक अनुभव सांगितला. ती इव्हेंटमध्ये पोहोचली तेव्हा प्रचंड घाबरली होती. नर्व्हस होती. कोण काय बोलेल याची तिला भीती वाटत होती. तेव्हाच पापाराझींनी तिच्यावर अशी काही कमेंट केली की ती अजूनच घाबरली
5 / 9
साईशाची कार्पेटवर एंट्री होताच पापाराझींमधून एकाचा आवाज आला,'कोई पहलवान आ रही है'. हे ऐकून ती खूप नर्व्हस झाली. मात्र जशी ती रेड कार्पेटवर आली पापाराझींनी तिला ओळखलं. नंतर सर्वजण तिच्याशी प्रेमानेच बोलले. तो एक क्षण तिच्यासाठी खूपच भीतीदायक होता असं ती म्हणाली.
6 / 9
साईशा अनेकदा बॉडीशेमिंगचा शिकार झाली आहे. ट्रान्सवुमन असल्याने तिला बरंच काही ऐकावं लागलं आहे. मी स्वत:मध्ये बदल करण्याचा फिट राहण्याचा प्रयत्न करतीये पण मला खूप शारिरीक समस्या आहेत असंही ती म्हणाली.
7 / 9
काहीही असलं तरी माझं स्वत:वर प्रेम आहे आणि नेहमीच करत आले आहे. पण मी स्वत:शीच खूप झगडा केला आहे. पण आता मी फिटनेसवर आणखी लक्ष द्यायचं ठरवलं आहे असंही तिने सांगितलं.
8 / 9
2021 मध्ये साईशाने मिस यूनिव्हर्स हरनाज संधूसाठी फिनालेचा ड्रेस डिझाईन केला होता. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी तिने ड्रेस डिझाईन केले आहेत. 2021 मध्येच तिने स्वप्नीलची साईशा झाल्याचं उघड केलं होतं आणि सार्वजनिक कार्यक्रमातही हजेरी लावली होती.
9 / 9
2015 मध्ये साईशाने अमेरिकन टीव्ही शो प्रोजेक्ट रनवेच्या 14 व्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. ट्रान्सवुमन बनल्यानंतर ती स्वत:ला आणखी जास्त कॉन्फिडंट समजते. तिला इंडस्ट्रीतूनही बराच पाठिंबा मिळतो.
टॅग्स :ट्रान्सजेंडरफॅशनमुंबईमुकेश अंबानी