Tunisha Sharma : "शीझान खानचं कुटुंब तुनिशाला चुकीची औषधं देत होतं, डिप्रेशन सांगून करायचे दिशाभूल" By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 6:28 PM1 / 10टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येचं गूढ उकलण्याऐवजी ते आता दोन कुटुंबातील भांडणात अडकत चाललं आहे. या प्रकरणात रोज नवनवीन अपडेट्स येत आहेत. न्यायालयात शीझान खानच्या जामिनावर झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी महत्त्वाचे खुलासे केले. 2 / 10वकिलांनी शीझान खानच्या जामिनाला विरोध तर केलाच, शिवाय अभिनेत्याच्या कुटुंबावरही गंभीर आरोप देखील केले आहेत. तुनिशाचे वकील तरुण शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी तुनिशाने आत्महत्या केली, त्या दिवशी तुनिशाने जेवण केले नव्हते. शीझान जेवला होता. 3 / 10ज्या दिवशी तुनिशाने आत्महत्या केली त्यादिवशी शीझानने पोलिसांना योग्य जबाब दिला नाही. शीझान सातत्याने आपली विधाने बदलत आहेत. त्याचा मोबाईल हा पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. त्याने अद्याप न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे नोंदवलेले नाही. 4 / 10आत्महत्येच्या दिवशी तुनिशा अलीशी बोलली हे शीझानच्या वकिलाला कसं कळलं? शीझानने तिच्या मोबाईलमधून अनेक चॅट डिलीट केले आहेत. चॅटचे काही भाग अजून मिळवायचे आहेत असं वकिलांनी म्हटलं आहे. तुनिशाच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. 5 / 10शीझान खान आणि तुनिशा शर्माच्या मेकअप रूम वेगळ्या होत्या. मग तुनिशा शीझानच्या मेकअप रूममध्ये का गेली? हे शोधणे बाकी आहे. कारण शीझानने काहीही स्पष्ट सांगितलेले नाही. आत्महत्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. तपासानंतर आणखी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. 6 / 10सुनावणीदरम्यान वकिलाने अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आणि मोनिका जाधव प्रकरणाचा संदर्भ दिला. वकिलाच्या म्हणण्यानुसार, शीझान आणि तुनिशा यांच्यात 45 मिनिटांत काय झाले याचे उत्तर शीझान देत नाही. ही संपूर्ण घटना 45 मिनिटांची आहे. हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. 7 / 10तपासादरम्यान शीझानला जामीन मिळाल्यास तपासात मोठा फरक पडू शकतो. तुनिशाच्या वकिलाने सांगितले - शीझानचे कुटुंबीय अभिनेत्रीला चुकीची औषधे देत होते. ही औषधे जयपूर येथील डॉक्टर देत होते. शीझानचे कुटुंब तुनिशाला तिच्या आईपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत होते. 8 / 10शीझानच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या फोटोंवरून हेच कळतं. ती डिप्रेशनमध्ये नव्हती, उलट तिला नीटनेटके राहायला आवडते. शीझानचे वकील याला उदासीनता म्हणत दिशाभूल करत आहेत. शीझानने तुनिषाचा वापर करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे 21 पुरावे आहेत. 9 / 10शीझानच्या वकिलाने जामिनासाठी मांडलेल्या 20 मुद्यांपैकी 18 मुद्दे निराधार आहेत. शीझाला जामीन देऊ नये. अभिनेत्री तुनिषा शर्माने गेल्या वर्षी 24 डिसेंबरला आत्महत्या केली होती. अभिनेत्रीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शीझान खानला ताब्यात घेतले. 10 / 10शीझानने आपल्या मुलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तुनिशाच्या आईने केला आहे. तुनिषा शर्माच्या मृत्यूचे कारण ब्रेकअप होते की आणखी काही, याचा तपास सुरू आहे. तर दुसरीकडे शीझानचे कुटुंब आणि तुनिशाचे कुटुंब समोरासमोर उभे ठाकले आहे. दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications