Join us

Tunisha Sharma : थीम केक, सरप्राईज बर्थडे पार्टी अन्...; 'असा' साजरा करायचा होता आईला तुनिशाचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 10:16 AM

1 / 13
अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत असून तुनिशाच्या आईने शिझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. आज तुनिशाचा वाढदिवस आहे. ती जर या जगात असती तर आज 21 वा वाढदिवस तिने सेलिब्रेट केला असता.
2 / 13
तुनिशाला तिचा यंदाचा वाढदिवस नेमका कसा साजरा करायचा होता हे तिने तिच्या आईला सांगितले होते. तिच्या आईने याबाबत आता माहिती दिली आहे. 'मला रोज आठवण करून दिली जाते की माझी मुलगी आता या जगात नाही. मला आता माझ्या मुलीबद्दल नकारात्मक बोलायचे नाही.'
3 / 13
'आज तिचा वाढदिवस आहे.. आज मला तिचा 21 वा वाढदिवस तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सांगून साजरा करायचा आहे. त्यामुळे चाहत्यांना हे कळेल की माझी मुलगी तुनिशा प्रत्यक्षात नेमकी कशी मुलगी होती' असं तुनिशाच्या आईने म्हटलं आहे. आजतकला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत त्यांनी याबाबत माहिती दिली.
4 / 13
'वाढदिवसाबद्दल काय सांगू... यावेळी मला तिला सरप्राईज पार्टी द्यायची होती. माझी मुलगी या वर्षी 21 वर्षांची झाली असती. मला वाटलं की मी एक थीम केक तयार करेन आणि तिच्या मैत्रिणींना आमंत्रित करेन... मी सुरुवातीपासूनच तिच्या वाढदिवसाच्या सरप्राईजचं प्लॅनिंग सुरू केलं होतं.'
5 / 13
'तुनिशा माझी एकुलती एक मुलगी आहे, मला तिचा वाढदिवस साजरा करायचा आहे... पण आता... तिला तिच्या वाढदिवसाची उत्सुकता कायम असायची. यावेळीही मी चंदीगडमध्ये केक कापून तिच्याशिवाय तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. तिची बेस्ट फ्रेंड रितिकाकडून केक करून घेईन.
6 / 13
'मी काहीच विचार केलेला नाही.. पुढे कसं होईल.. मला काहीच समजत नाही. पहिली गोष्ट म्हणजे माझी मुलगी आता नाही यावर माझा विश्वास बसत नाही. मला अजूनही वाटतंय की आता ती येईल आणि मम्मा म्हणून हाक मारेल. आयुष्य कसं असेल माहीत नाही... मी फक्त तुनिशासाठी मुंबईत होते.'
7 / 13
'आता ती नाही, त्यामुळे हे शहरही माझ्यासाठी नाही. मी चंदिगडला शिफ्ट होत आहे. मी तिथे तुनिषाच्या आजोबांकडे राहीन. माझ्या पतीचे 2011 मध्ये निधन झाले. त्यांना लिव्हर सिरोसिस झाला होता. त्यावेळी तुनिशा 9 वर्षांची होती. तुनिशा माझ्यापेक्षा तिच्या वडिलांच्या जवळ होती.'
8 / 13
'एक दिवस गेला नाही जेव्हा तिचे वडील आले आणि ती त्याच्याबरोबर राहिली नाही. वडिलांशिवाय तिला झोप येत नव्हती. त्याच्या जाण्यानंतर ती गप्प झाली. 2014 मध्ये आम्ही पुन्हा मुंबईत आलो. मग ती दिवसेंदिवस बिझी होत गेली' असं तुनिशाची आई वनिता शर्माने म्हटलं आहे.
9 / 13
तुनिशा शर्माच्या मृत्यूवर शीझान खानने आता पहिली प्रतिक्रिया दिल्याची माहिती समोर आली आहे. 'मी निर्दोष आहे... माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास' असं म्हटलं आहे. शीझान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मिश्रा म्हणाले, 'वसई, कोर्टात हजर करण्यापूर्वी शीझान खानने त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.
10 / 13
अभिनेता इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना म्हणाला, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी निर्दोष आहे, सत्यमेव जयते...' तसेच शीझानच्या वकिलाने पुढे म्हटले आहे की, ते सोमवारी कोर्टात जामीन अर्ज सादर करणार आहेत. तुनिशाच्या आईने शीझानवर आता गंभीर आरोप केले आहेत.
11 / 13
शीझानच्या वकिलांनी यानंतर आता गंभीर आरोप केला आहे की, तुनिशाचे तिच्या कुटुंबियांशी चांगले संबंध नव्हते. एवढेच नाही तर अभिनेत्रीच्या आईने तिचा गळा दाबला होता. शीझान खानच्या वकिलाने पत्रकार परिषदेत दावा केला आहे की, तिच्या आईने तुनिशाचा गळा दाबला होता.
12 / 13
तुनिशाने ही गोष्ट मालिकेच्या दिग्दर्शकालाही सांगितली होती ज्यामध्ये ती त्यावेळी काम करत होती. याशिवाय तिने आपल्या आईचा मित्र असलेल्या संजीव कौशलचाही उल्लेख केला. वकिलाचे म्हणणे आहे की, तुनिशा संजीवला घाबरत होती. संजीवमुळे एंग्जाइटी इश्यू होता आणि याच कारणामुळे ती तिचा मित्र कंवर ढिल्लोसोबत तीन महिने राहिली.
13 / 13
शीझानच्या वकिलाचा असाही दावा आहे की, तिची आई तुनिशाच्या कष्टाची कमाई स्वत:कडे ठेवायची आणि तिने तिला त्यातला एक पैसाही दिला नाही. पैशांसाठी तुनिशाला वारंवार आईसमोर हात पसरायची. तसेच आई वनिता शर्मा तुनिशाला पैसे मागितल्यावर खूप प्रश्न विचारत असे.
टॅग्स :तुनिशा शर्मा