"लॅपटॉपपासून ते कारपर्यंत सर्व काही EMI वर", तुनिषाच्या आईनं सत्य सांगितलं अन् मनातलं दु:खही! By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 8:41 PM1 / 10टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येच्या घटनेतून तिची आई अजूनही सावरू शकलेली नाही. मुलीच्या अशा जाण्याचं आईला दु:ख तर आहेच पण त्यापेक्षा जास्त वाईट तिच्या मुलीबाबत विचारल्या जात असलेल्या प्रश्नांचं आहे. अखेर तुनिषाच्या आईनं मनमोकळं केलं आहे. 2 / 10तुनिषाची आई प्रॉपर्टीवर हक्क गाजवत होती असा आरोप केला जात आहे. तुनिषाला तिची आई दैनंदिन खर्चासाठी देखील पैसे देत नव्हती असा आरोप शीजान खानच्या बहिणींनी केला आहे. ती कुठं फिरायला देखील जात नसे. तिनं कमावलेल्या सर्व पैशावर आईनं कब्जा केला होता. तसंच काम करण्यासाठी तिची आई तिच्यावर दबाव टाकायची, असे खळबळजनक आरोप केले गेले. यावर तिच्या आईनं जे आज सांगितलं आहे ते धक्कादायक आहे. 3 / 10'तुनिषा लहान असल्यापासूनच मी तिच्यासोबत सेटवर राहायचे. आता ती १८ वर्षांची झाल्यानंतर मी तिला सेटवर एकटीला जाऊ देत असे. तिच्यासोबत एका बॉयची देखील नेमणूक केली होती. ती स्वतंत्र असावी असं माझंही म्हणणं होतं. उद्या जर मला काही झालं तर सर्व गोष्टी तिला सांभाळता आल्या पाहिजेत असं मला वाटायचं. माझी मुलगी खूप साधी होती', असं तुनिषाच्या आईनं सांगितलं4 / 10'मी तुनिषाची आई असले तरी तिच्यासाठी तिची बेस्ट फ्रेंड होते. तिला कोणत्याच गोष्टीची कमतरता कधीच जाणवू दिली नाही. तिला शॉपिंगची आवड नव्हती, पण महागड्या गोष्टी तिला आवडायच्या आणि ती जे काही घ्यायची ते ब्रँडेड असायचं. तिला आयफोन हवा होता, मोठी कार घ्यायची होती. मी एक बातमी वाचली की तुनिषा तिच्या पश्चात खूप प्रॉपर्टी सोडून गेली. पण खरंतर पुढच्या वर्षी मी आणि तुनिषा नवं घर घेण्याचा प्लान करत होतो. आता मी मीरारोडला भाड्याच्या घरात राहातो आणि लॅपटॉपपासून कारपर्यंत सर्व EMI वर आहे', असं तुनिषाच्या आईनं सांगितलं. 5 / 10'लोक म्हणतात की माझी मुलगी प्रेग्नंट होती आणि आपल्यामागे तिनं खूप प्रॉपर्टी सोडली आहे. रोज सकाळी उठले की नवनव्या गोष्टी ऐकायला मिळतात. माझी मुलगी या जगात नाही याची मला दररोज या बातम्या आठवण करुन देतात. माझ्या मुलीबद्दल आज तिच्या पश्चात खूप वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत. पण तिच्या चाहत्यांना ती कशी होती हे पूर्णपणे ठावूक आहे', असंही तिची आई म्हणाली. 6 / 10'सर्वांना ठावूक आहे तुनिषाला पहिला ब्रेक फितूर सिनेमातून मिळाला. पण त्याआधी तुनिषानं चंदीगडमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यासाठी एका कर्मशियल शूट केलं होतं. त्यावेळी तुनिषाला ज्या कोरिओग्राफरनं डान्स शिकवला होता त्यानं मला येऊन सांगितलं होतं की तुमची मुलगी खूप टॅलेंटेड आहे. तिच्यावर लक्ष द्या ती खूप पुढे जाऊ शकते. तिला मुंबईला घेऊन जा. तिच्या अभिनयाचं सर्व जण कौतुक करत होते', असं तुनिषाच्या आईनं सांगितलं. 7 / 10लहानपणापासूनच तुनिषा खूप टॅलेंटेड होती. ती अभ्यासातही खूप हुशार होती. एकदा का एक गोष्ट तिनं समजून घेतली की ती कधीच विसरत नसे ही तिची जमेची बाजू होती. माझ्या मुलीचं अभिनय कौशल्य तिला गॉड गिफ्टेड होतं. आमच्या कुटुंबात कुणीही या क्षेत्राशी निगडीत नाही. तुनिषाच्या शाळेत ज्या ज्या वेळी पॅरेंट्स किंवा टिचर मिटिंग असायची तेव्हा तिचे शिक्षक तिचं तोंडभरुन कौतुक करायचे, असं तुनिषाच्या आईनं सांगितलं. 8 / 10मुंबईत आल्यानंतर तुनिषाचा पोर्टफोलिओ बनवला होता आणि अनेक प्रोडक्शन हाऊसला पाठवला होता. यातच साजिद नादियादवाला यांच्या ऑफीसलाही पोर्टफोलिओ पाठवला होता. सलमान खानसोबतच्या एका सिनेमासाठी तिची निवडही झाली होती. पण त्या रोलसाठी तिला संपूर्ण केस कापावे लागणार होते. मीच त्या सिनेमासाठी नकार कळवला होता. कारण तुनिषाचे केस कापावेत यासाठी मी तयार नव्हते, असाही एक किस्सा तुनिषाच्या आईनं सांगितलं. 9 / 10तुनिषाला घेऊन मुंबईत फक्त दोनच दिवसांसाठी आलो होतो पण वेळ अशी आली की वर्षभर आम्हाला चंदीगडला जाता आलं नाही. तुनिषा सोनी चॅनलसाठी लॉक झाली होती. ज्यात तिला महाराणा प्रतापमध्ये चांद कंवरची भूमिका देण्यात आली होती. त्यानंतर दहा ते वीस दिवसांतच तिला फितूर सिनेमा मिळाला होता. लागोपाठ काम मिळत गेलं आणि आम्ही मुंबईतच राहिलो, असं तुनिषाची आई म्हणाली. 10 / 10'तुनिषाला खाण्याचीही प्रचंड आवड होती. चिकनशिवाय तर तिचा दिवस जायचा नाही. याशिवाय तिला मॅगी आणि पास्ता खूप आवडायचा. चिकन चिल्ली, लेमन चिकनसाठी ती नेहमी माझ्याकडे हट्ट करायची आणि मी तिच्या आवडीचं सगळं तिला करुन खाऊ घालत असे' आणखी वाचा Subscribe to Notifications