३ वाजता बॉयफ्रेंडसोबत लंच आणि ३.१५ वाजता आत्महत्या ? त्या १५ मिनिटात नेमके काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 02:33 PM2022-12-26T14:33:47+5:302022-12-26T14:41:29+5:30

टीव्ही अभिनेत्री तुनिषाच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. मालिकेच्या सेटवरच तुनिषाने गळफास घेत जीवन संपवले. ३ वाजता तुनिषाने जेवण केले आणि ३.१५ वाजता तिने आत्महत्या केली. त्या १५ मिनिटांच्या वेळेत नेमके असे काय झाले.

तुनिषाने तिचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खान मुळे आत्महत्या केल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे.

त्या दिवशी मालिकेच्या सेटवर तुनिषाने सोशल मीडियावर रील्सही पोस्ट केले होते.

शिझान आणि तुनिषाने मेकअपरुममध्ये जेवण केले. दुपारी ३ वाजता त्यांनी जेवण केल्याचं तिच्या आईने सांगितलं.

त्यानंतर शिझान शूटसाठी बाहेर पडला आणि तुनिषा मेकअपरुममध्येच होती.

३.१५ वाजता मेकअपरुममध्येच तुनिषा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

मग हे मधले १५ मिनिटं नेमके असे काय घडले की तुनिषाने इतके टोकाचे पाऊल उचलले याचा तपास आता पोलिस करत आहेत.

शिझान खानला २८ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

१५ दिवस आधीच दोघांमध्ये ब्रेकअप झाला होता अशी माहिती तिच्या आईनेच पोलिसांना दिली आहे.