बोल्ड अँड ब्युटीफूल! 21 वर्षीय अभिनेत्री अवनीत कौर कोट्यवधींची मालकीण; पाहा ग्लॅमरस फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 5:30 PM1 / 10टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन अवनीत कौर ही अशा स्टार्सपैकी एक आहे जिने लहान वयात मोठं नाव कमावलं आहे. याशिवाय कोट्यवधींची संपत्तीही कमावली आहे. अवनीत कौरही तिच्या सिझलिंग फोटोंमुळे खूप चर्चेत आहे. 2 / 10अवनीत कौर ही इन्स्टाग्रामवरील एक मोठी सेलिब्रिटी आहे. तिचे 32 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. अभिनेत्री दररोज तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. 21 वर्षीय अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण आहे.3 / 10पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अवनीतची सिझलिंग स्टाईल पाहायला मिळत आहे, जी चाहत्यांना खूप आवडते. तिच्या अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. 4 / 10अवनीत कौरने 2010 मध्ये डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्समधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. ती उत्तम डान्सर आहे. त्यानंतर 2014 साली मर्दानी या चित्रपटातही ती दिसली होती. 5 / 10अभिनेत्री असण्यासोबतच अवनीत कौर ही देशातील सर्वात मोठ्या इन्फुएंसर्सपैकी एक आहे. तिचे असंख्य चाहते आहेत. तिच्या इन्स्टाग्रामवर 32.6 मिलियन म्हणजेच सुमारे तीन कोटी 26 लाख फॉलोअर्स आहेत.6 / 10अवनीत कौरकडे करोडोंची संपत्ती आहे. CakeKnowledge.com नुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती 11 कोटी रुपये आहे. ती दर महिन्याला 8 लाखांहून अधिक कमावते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - इन्स्टाग्राम)7 / 10मीडिया रिपोर्टनुसार, अलीबाबा चॅप्टर 1 ऑफ एयर करत चॅप्टर 2 ची सुरुवात दाखवण्यात येणार आहे. 'शो'च्या दुसऱ्या चॅप्टरसाठी आता नवीन पात्रांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान अलीबाबाच्या भूमिकेसाठी अभिनेता अभिषेक निगमला साईन करण्यात आल्याची चर्चा आहे, तर शहजादी मरियम च्या भूमिकेसाठी अवनीत कौर दिसेल अशी शक्यता आहे. 8 / 10अवनीत कौर तुनिशाच्या जवळच्या मित्रपरिवारातली एक होती. अलीबाबाच्या चॅप्टर 2 मध्ये अवनीत असेल यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. जर ही नावं फायनल झाली तर अभिषेक आणि अवनीत पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील. 9 / 10अवनीतने याआधी अभिषेकचा भाऊ सिद्धार्थ निगमसोबत (Siddharth Nigam) 'अलादीन' या मालिकेत काम केले आहे. मालिकेतील ही जोडी खूप पसंत केली गेली. आता अभिषेक आणि अवनीतची जोडीही खूप पसंत केली जाईल. 10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications