अभिनेत्यासोबत मोडला साखरपुडा, आता लग्नाआधीच अभिनेत्रीला व्हायचंय 'आई' By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 4:26 PM1 / 8सिनेसृष्टीत एकीकडे लग्नाचे वारे वाहत असताना काही कपल्सचं ब्रेकअपही झालं आहे. कोणी घटस्फोटच घेतला तर कोणी साखरपुडाच मोडला.2 / 8काही दिवसांपूर्वीच 'शिव शक्ती- तप त्याग तांडव' मध्ये पार्वतीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री सुभा राजपूतने (Subha Rajput) अभिनेता विभव रायसोबत (Vibhav Roy) साखरपुडा मोडला.3 / 85 डिसेंबर 2022 रोजीच ते एंगेज झाले होते. मात्र आता दोघांनी एकमेकांच्या सहमतीने नातं तोडण्याचा निर्णय घेतला.4 / 8आता अभिनेत्री सुभाने लग्नाआधीच बेबी प्लॅनिंगविषयी भाष्य केले आहे. 'पिंकव्हिला'शी बातचीत करताना तिने लग्न आणि मुलांबाबतीत केलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.5 / 8सुभा म्हणाली,'मला मूल हवं आहे आणि लवकरच मी यासाठी प्लॅनिंग करेन. मी आयुष्यात खूप सहन केलं आहे. अशात आता मी सर्व गोष्टी विचारपूर्वक हँडल करते.'6 / 8ती पुढे म्हणाली,'आता मी आयुष्यात माझा दृष्टिकोन बदलला आहे. आतापर्यंत माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले. काही माझ्यासाठी चांगले सिद्ध झाले यासाठी मी खूप खूश आहे.'7 / 8वयाच्या ३० व्या वर्षी सुभाने 'शिव शक्ती:तप त्याग तांडव' मालिकेत तीन मुलांच्या आईची भूमिका साकारली. आता तिने खऱ्या आयुष्यात लग्नाआधीच मूल हवं असल्याची इच्छा जाहीर केली आहे.8 / 8सध्या सुभा 'शिव शक्ती' मालिकेत देवी शक्तीच्या भूमिकेत दिसत आहे. ही मालिका टीआरपीमध्ये सलग टॉप 5 मध्ये आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications