वयाच्या 16व्या वर्षी लग्न, 17 मध्ये झाली जुळी मुलं; 18 व्या वर्षी घटस्फोट; कोण आहे ही टीव्ही अभिनेत्री? By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 3:24 PM1 / 10मनोरंजनविश्वात असे अनेक किस्से आहेत जे ऐकून धक्काच बसतो. ब्रेकअप, पॅचअप, घटस्फोट हे तर सामान्यच आहे. पण एक अशी टीव्ही अभिनेत्री आहे जिचा घटस्फोट अवघ्या १८ व्या वर्षी झाला. कोण आहे ती अभिनेत्री?2 / 10टीव्ही मालिकांमध्ये खलनायिकेच्या भूमिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या या अभिनेत्रीची जीवनकहाणी फारच धक्कादायक आहे. १६ व्या वर्षी लग्नबंधनात अडकलेल्या या अभिनेत्रीने वयाच्या 17 व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला. तर १८ व्या वर्षी तिचा घटस्फोटही झाला.3 / 10'कसोटी जिंदगी की' मालिकेत कोमोलिका या व्हॅम्प भूमिकेमुळे तिला सगळे कोमोलिका म्हणूनच ओळखू लागले. ती अभिनेत्री म्हणते उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia). तिच्या प्रोफेशनल आयुष्याविषयी सगळ्यांनाच माहित आहे पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात बरंच काही झालं आहे.4 / 10उर्वशीचं लग्न खूपच कमी वयात झालं होतं. अवघ्या १६ व्या वर्षी तिने लग्नगाठ बांधली. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नानंतर दोनच वर्षात ती पतीपासून वेगळी झाली.5 / 10 जेव्हा ती वेगळी झाली तेव्हा ती गरोदर होती. वयाच्या १७ व्या वर्षीच तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. सागर आणि क्षितिज अशी त्यांची नावं आहेत. तिने एकटीनेच मुलांचा सांभाळ केला. तेव्हापासून आजपर्यंत तिने दुसरं लग्न केलं नाही.6 / 10उर्वशीने एका मुलाखतीत खुलासा करताना सांगितले होते की जेव्हा मुलांच्या शिक्षणासाठी तिला पैशांची गरज होती तेव्हा तिने फीस भरण्यासाठी पायलट एपिसोड शूट केला होता. यानंतरही तिला अर्धेच पैसे मिळाले. 7 / 10उर्वशी ढोलकिया बिग बॉस 6 ची विजेतीही राहिली आहे. तिचा टेलिव्हिजन इंडस्ट्रीत दबदबा आहे. ती म्हणाली होती की,'माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करण्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय नाही. सोबतच मला मुलांकडे लक्ष द्यायचं असतं.'8 / 10उर्वशी अनेक वर्ष टीव्ही अभिनेता अनुज सचदेवासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी 'नच बलिए 9' डान्स शोमध्ये सहभाग घेतला होता. मात्र उर्वशी त्याच्यापेक्षा मोठी असल्याने आणि तिला दोन मुलं असल्याने त्यांच्यातील नातं तुटलं. अनुजने कधीच हे नातं सर्वांसमोर मान्य केलं नव्हतं. 9 / 10उर्वशीची दोन्ही मुलं सागर आणि क्षितीज सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहेत. क्षितीजचे युट्यूबवर मिलियन सबस्काइबर्स आहेत. तो रोज व्लॉग शेअर करत असतो. यामध्ये उर्वशीही अनेकदा मुलांसोबत मस्ती करताना दिसते. 10 / 10आज उर्वशी ४४ वर्षांची असून फिटनेसबाबतीत तरुणींनाही मात देणारी आहे. तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहून सर्वच आश्चर्यचकीत होतात. सध्या ती दोन्ही मुलांसह आयुष्य आनंदात जगत आहे. तसंच ती सध्या 'झलक दिखला जा' मध्ये दिसत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications