By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 15:29 IST
1 / 8बॉलिवूडमध्ये सध्या दीपिका पदुकोणच्या प्रेग्नंसीची चर्चा आहे. कालच तिने बेबी बंप फ्लॉन्ट करत हॉट फोटोशूट पोस्ट केलं. यामध्ये रणवीर सिंहचाही रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. दीपिकाने हे फोटोशूट करत फेक बेबी बंप म्हणणाऱ्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं. 2 / 8आता आणखी एका अभिनेत्रीने प्रेग्नंसी फोटोशूट केलं आहे. ग्लॅमरस आऊटफिटमध्ये तिने बेबी बंप फ्लॉन्ट केलं आहे. यात अभिनेत्री अप्सरेसारखीच सुंदर दिसत आहे.3 / 8ही अभिनेत्री आहे युविका चौधरी. काही दिवसांपूर्वीच युविकाचं डोहाळ जेवण संपन्न झालं होतं. तर आता तिने मॅटर्निटी फोटोशूट पोस्ट केलं आहे. यात तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो स्पष्ट दिसतोय.4 / 8स्टायलिश व्हाईट लाँग गाऊनमध्ये तिने पहिला फोटो पोस्ट केला आहे. आजूबाजूला फुलांचं सुंदर डेकोरेशन आहे. तसंच तिच्या गाऊनला मोठं एक्सेंन्शन आहे ज्यामुळे सुंदर लूक मिळाला आहे.5 / 8युविका या फोटोशूटमध्ये अगदी कॉन्फिडंट दिसत आहे. व्हाईट थाय स्लीट गाऊन आणि बेबी बंप तिला सूट करतोय. तिच्या सौंदर्यात आणखी भर पडलेली दिसत आहे.6 / 8आणखी एका फोटोत युविकाने ट्रान्सपरंट स्कीन टाईट शिमरी गाऊन घातला आहे. यात ती अतिशय बोल्ड दिसत आहे. तसंच हेअरस्टाईलही अगदी जमून आली आहे. 7 / 8प्रेग्नंसी ग्लो आणि मेकअप यामुळे युविकाचा चेहरा अगदी खुलून आला आहे. छोट्या पाहुण्याच्या येण्याची चाहुल लागलेली असताना आईचं सौंदर्यही दिवसेंदिवस वाढत आहे.8 / 8प्रिन्स आणि युविकाने २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. बिग बॉसमध्ये ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. आता लग्नानंतर ६ वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत.