Join us

वयाच्या 18 व्या वर्षीच अभिनेत्रीचा झालेला घटस्फोट; एकटीनेच केला जुळ्या मुलांचा सांभाळ; कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 14:59 IST

1 / 9
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय खलनायिका. तिच्या एका लूकने समोरचा गार व्हायचा. 'कोमोलिका' या नावाने तिला खरी ओळख मिळाली. कोण आहे ही अभिनेत्री?
2 / 9
२००३ साली आलेल्या 'कसौटी जिंदगी की' मालिकेतली खलनायिका कोमोलिका आठवतेय का? अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने (Urvashi Dholakia) हे पात्र साकारलं होतं. प्रोफेशनल आयुष्यात यश मिळवलेल्या उर्वशीला वैयक्तिक आयुष्यात मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं.
3 / 9
उर्वशी ढोलकियाला नकारात्मक भूमिकांमुळेच जास्त ओळखलं जातं. कसौटी नंतर ती 'नागिन' मध्येही निगेटिव्ह कॅरेक्टरमध्येच दिसली. पडद्यावर व्हॅम्प असणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात नक्की कशी आहे माहितीये का?
4 / 9
उर्वशीचं वयाच्या १६ व्या वर्षीच लग्न झालं होतं. १७ व्या वर्षी ती गरोदर राहिली. उर्वशीने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र मुलांच्या जन्मानंतरही तिचा पती कोणतीच जबाबदारी घेत नसल्याने तिने वयाच्या १८ व्या वर्षीच घटस्फोट घेतला.
5 / 9
उर्वशीने तेव्हापासून एकटीनेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला. तिने नंतर कधीच पतीकडे मागे वळून बघितलं नाही. तिच्या मुलांनाही त्यांचे वडील कोण हे माहित नाही. तेव्हापासून आजपर्यंत तिने दुसरं लग्नही केलं नाही.
6 / 9
उर्वशीने एका मुलाखतीत खुलासा करताना सांगितले होते की जेव्हा मुलांच्या शिक्षणासाठी तिला पैशांची गरज होती तेव्हा तिने फीस भरण्यासाठी पायलट एपिसोड शूट केला होता. यानंतरही तिला अर्धेच पैसे मिळाले.
7 / 9
उर्वशी ढोलकिया बिग बॉस 6 ची विजेतीही राहिली आहे. तिचा टेलिव्हिजन इंडस्ट्रीत दबदबा आहे. ती म्हणाली होती की,'माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करण्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय नाही. सोबतच मला मुलांकडे लक्ष द्यायचं असतं.'
8 / 9
दरम्यान उर्वशी मधल्या काळात अभिनेता अनुज सचदेवाला डेट करत होती. दोघांनी नच बलिये मध्ये सहभाग घेतला होता. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही.
9 / 9
उर्वशीची सोशल मीडियावर हवा असते. तिचा फिटनेस आणि लूक्स तरुणींनाही मात देणारे आहे.
टॅग्स :उर्वशी ढोलकियाटिव्ही कलाकारपरिवारलग्नघटस्फोट