Join us

Urvashi Rautela Lifestyle: फ्लॉप सिनेमात काम करूनही उर्वशी रौतेला जगते लक्झरी लाइफ, जाणून घ्या तिच्या कमाईचा इन्कम सोर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 11:51 AM

1 / 9
‘सनम रे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)ने तिच्या सौंदर्यानेही रसिकांवर मोहिनी घातली. (Photo Instagram)
2 / 9
आपल्या सौंदर्यासह हटके स्टाईलसाठी उर्वशी प्रसिद्ध आहे. नेहमीच्या महागड्या गोष्टींमुळेच उर्वशी रौतेलाला ‘फॅशन दिवा’ म्हणून संबोधले जाते. (Photo Instagram)
3 / 9
ती बऱ्याचदा अशा सुपर हॉट आणि महागड्या फॅशनेबल लूकमध्ये दिसत असते. उर्वशीचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे.(Photo Instagram)
4 / 9
उत्तराखंडमधील हरिद्वार येथे लहानाची मोठी झालेल्या उर्वशीने वयाच्या १५ व्या वर्षीच मॉडलिंगची सुरुवात केली. २००९ मध्ये तिने 'मिस टीन इंडिया' चा खिताब जिंकला.(Photo Instagram)
5 / 9
6 / 9
मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्वशी रौतेलाची एकूण संपत्ती 36 कोटी रुपये आहे. उर्वशी रौतेला हिची गणना बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते, जिची महिन्याची कमाई 45 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. (Photo Instagram)
7 / 9
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अभिनेत्री चित्रपट आणि गाण्यांमधून मोठी कमाई करतात. इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ती एका गाण्यासाठी 35 ते 40 लाख रुपये घेते. एका चित्रपटासाठी 3 कोटी रुपये मानधन घेते.(Photo Instagram)
8 / 9
याशिवाय उर्वशीची अर्धी कमाई ब्रँड एंडोर्समेंट आणि मॉडेलिंगमधूनही येते. तिला अनेक मोठ्या फॅशन डिझायनर्सची शोस्टॉपर बनण्याचा फायदा झाला आहे.(Photo Instagram)
9 / 9
उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिचा 'नॉट युअर बेबी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Photo Instagram)
टॅग्स :उर्वशी रौतेलाबॉलिवूड