IN PICS : कधी हॉटेलमध्ये काम करायची वाणी कपूर, आज आहे इतक्या कोटींची मालकीण! By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 1:08 PM1 / 10‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअर सुरु करणाऱ्या वाणी कपूरच्या खात्यात फार चित्रपट नाहीत. पण याऊपरही बॉलिवूडमध्ये तिने एक वेगळे स्थान निर्माण केलंआहे. आज वाणीचा वाढदिवस. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाणीबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊयात...2 / 1023 ऑगस्ट 1988 रोजी दिल्लीत वाणीचा जन्म झाला. तिचे वडील शिव कपूर फर्निचर एक्सपोर्टचा व्यवसाय करतात. सोबत एक एनजीओही चालवतात. वाणीने अभिनेत्री बनू नये, असं तिच्या वडिलांचं मत होतं. 3 / 10मुलींनी लवकर लग्न करून संसार करावा, असे तिच्या वडिलांना वाटे. याचमुळे वाणीच्या बहिणीचं केवळ वयाच्या 18 व्या वर्षी लग्न झालं होतं. वाणीला मात्र लग्न करून संसार करण्यात कुठलाही रस नव्हता.4 / 10 टूरिझममध्ये आवड असल्यानं सुरुवातीला वाणीने त्यातच पदवी घेण्याचा निर्णय घेतला. टूरिझममध्ये पदवी घेतल्यानंतर तिने काही दिवस हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नोकरी केली. 5 / 10त्याआधी ओबेरॉय हॉटेल आणि जयपूरमधील एका रिसॉर्टमध्ये तिने इंटर्नशिपही केली. याच इंटर्नशिपच्या आधारावर तिला आयटीसी हॉटेलमध्ये नोकरी मिळाली.6 / 10तिचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व पाहता हॉटेलमध्ये काम करत असतानाच तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळू लागल्या. पण वडिलांचा विरोध होता. या काळात आईने वाणीला आधार दिला. ती खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिली.7 / 10मॉडेलिंगच्या काळातच यशराज फिल्म्सच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’साठी ऑडिशन्स सुरु असल्याचं तिला कळलं. ती ऑडिशनला गेली. तिची निवड झाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.8 / 10चित्रपटांशिवाय वाणी मॉडेलिंगच्या दुनियेतही अॅक्टिव्ह आहे. मॉडेलिंग, फोटोशूट, जाहिराती यातून वाणी तगडी कमाई करते. आज वाणी कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.9 / 10मीडिया रिपोर्टनुसार, वाणी कपूरकडे 10 कोटींची संपत्ती आहे. मात्र नेटवर्थपीडियानुसार, वाणी सुमारे 37.50 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. दिल्ली व मुंबईत तिचं घर आहे. तिच्याकडे अलिशान कारचं कलेक्शन आहे. अर्थात याची अधिकृत माहिती नाही.10 / 10वाणी कपूर अलीकडे ‘शमशेरा’ या चित्रपटात दिसली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. त्याआधी ती चंदीगड करे आशिकी, बेलबॉटम, बेफिक्रे आणि वॉरमध्ये दिसली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications