Chandrika Dixit : "मला सलमानसोबत..."; चित्रपटात बोल्ड सीन्स करण्याबाबत 'वडा पाव गर्ल'ने स्पष्टच सांगितलं By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 4:04 PM1 / 10'वडा पाव गर्ल' अशी ओळख असलेली चंद्रिका दीक्षित बिग बॉस OTT 3 मधून बाहेर पडली आहे. मात्र या शोचा भाग झाल्यानंतर चंद्रिका आता मनोरंजन विश्वात येण्याचं स्वप्न पाहत आहे.2 / 10दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकल्यानंतर चंद्रिका दीक्षितला आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत चित्रपटांमध्ये नाव कमवायचं आहे.3 / 10Filmygyan ला दिलेल्या एका मुलाखतीत चंद्रिकाला विचारण्यात आलं होतं की, जर तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर तिला कोणासोबत काम करायला आवडेल?4 / 10यावर चंद्रिका दीक्षितने 'जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच चित्रपटात काम करेन' असं म्हटलं आहे. 5 / 10'मी आधी म्हटल्याप्रमाणे मला बोल्ड सीन्स करायला अजिबात आवडत नाही. मी जी कोणतीही व्यक्तिरेखा साकारेन ती अगदी उत्तमरित्या करेन.'6 / 10'अभिनेता सलमान खानला भेटण्याची खूप इच्छा आहे' असं वडापाव गर्लने म्हटलं आहे. 7 / 10यावर तिला विचारण्यात आलं की, तिला सलमान खानसोबत काम करायला आवडेल का? तर तिने मला नक्कीच त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे असं उत्तर दिलं.8 / 10'वडापाव गर्ल' अशी ओळख असलेली चंद्रिका आधी पूर्णवेळ नोकरी करायची. पण जेव्हा कोविडच्या काळात तिच्या मुलाची तब्येत बिघडली तेव्हा चंद्रिका आणि तिचा पती यश गेरा यांना नोकरी सोडावी लागली. 9 / 10दोघांनीही आपल्या मुलाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघांनी दिल्लीत वडापावचा स्टॉल लावला आणि काही वेळातच त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. 10 / 10मुंबई स्टाईलमध्ये वडापाव विकण्याची चंद्रिका आणि तिच्या नवऱ्याची कल्पना एकदम जबरदस्त असल्याने लोकांची गर्दी होऊ लागली. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर चंद्रिका लोकप्रिय झाली. आणखी वाचा Subscribe to Notifications