व्हॅलेंटाईन वीकेंडला 'हे' रोमॅंटिक सिनेमे नक्की पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 5:21 PM1 / 10बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आणि काजोल यांच्यातील केमिस्ट्रीने रंगलेल्या या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम ठेवलं आहे. हा चित्रपट चाहते कधीही, केव्हाही आणि कितीही वेळा पाहू शकतात. हा सिनेमा तुम्ही अॅमझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. 2 / 10प्रेमाबद्दल बोलताना टायटॅनिक या हॉलिवूड चित्रपटाचा उल्लेख न करणे हे कसे शक्य आहे. तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर हा आयकॉनिक चित्रपट पाहू शकता.3 / 10मृणाल ठाकूर आणि सलमान दुलकर यांचा 2022 साली रिलीज झालेला 'सीतारामम' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटात प्रेमाची कथा अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता. 4 / 10असे काही चित्रपट असतात जे प्रेक्षकांच्या हृदयात एक खास जागा मिळवतात. यातील एक असा चित्रपट म्हणजे '96'. या चित्रपटात विजय सेतुपती, त्रिशा कृष्णन हे मुख्य कलाकार म्हणून दिसले होते. हा चित्रपट रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. हा म्युझिकल रोमँटिक ड्रामा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म MX Player वर पाहता येईल.5 / 10रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी अभिनीत हा रॉकस्टार हा चित्रपट तुमचा व्हॅलेंटाइन डे आणखी खास बनवेल. तुम्ही हा सिनेमा Jio सिनेमावर पाहू शकता.6 / 102 स्टेट्स चित्रपटात आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात तुम्हाला प्रेमाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा चेतन भगत यांची कादंबरी टू स्टेट्स, द स्टोरी ऑफ माय मॅरेज लाइफ या पुस्तकावर आधारित आहे. हा सिनेमा तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता. 7 / 10करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचा सुपरहिट चित्रपट 'जब वी मेट' देखील ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. आजही जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर दाखवला जातो तेव्हा अनेकजण पाहातात. 8 / 10'प्यार दोस्ती है...'असं म्हटलं की लगेचच डोळ्यांसमोर 'राहुल', 'अंजली', 'टीना' ही पात्र उभी राहतात. 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट आजही आवडीने पाहिला जातो. चित्रपट आतापर्यंत रोमँटिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. तुम्ही हा सिनेमा अॅमझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. 9 / 10सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनलेल्या 'नोटबुक' चित्रपटाची कथा इतर बॉलिवूड चित्रपटांपेक्षा खूपच वेगळी आहे. झहीर इक्बाल आणि प्रनूतन बहल अभिनीत या चित्रपटाचा तुम्ही प्राइम व्हिडीओवर आनंद घेऊ शकता.10 / 102001 साली आलेला 'रहना है तेरे दिल मे'(Rehna Hai Tere Dil Mein) सिनेमाची स्टोरी तर जबरदस्त आहेच. पण यातील गाणी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतली. प्रेमाचं गाणं असो, मैत्रीचं गाणं असो किंवा विरहाचं गाणं असो प्रत्येक गाणं तरुणांना आपलंसं वाटलं. आजही सिनेमातील गाणी हमखास कुठे ना कुठे लावलेली असतात. हा सिनेमा तुम्ही हॉट स्टारवर पाहू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications