देशमुखांच्या सूनबाई म्हणतायेत, 'गेली १० वर्ष मी रितेश, मुलं, व सासूबाईंना सांभाळतेय, माझं आयुष्यच...' By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 7:00 AM1 / 9अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया डिसुजा-देशमुख (Genelia D'souza-Deshmukh) यांच्या वेड (Ved Marathi Movie) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी केली आहे. वेड या मराठी चित्रपटांना बऱ्याच बड्या बड्या चित्रपटांना मागे टाकले आहे. (Photo Instagram) 2 / 9अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट आपले स्थान टिकवून ठेवले आहे.(Photo Instagram) 3 / 9 सलग १४व्या दिवशी या चित्रपटाने १.५३ कोटींची कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने एकूण ४०.१७ कोटींचा गल्ला जमवला आहे.(Photo Instagram) 4 / 9या चित्रपटातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे तर जिनिलिया देशमुखने मराठी सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे. (Photo Instagram) 5 / 9पहिल्याच मराठी सिनेमात जिनिलियाच्या भूमिकेचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये ती फक्त घर, संसार आणि मुलं सांभळत होती याबाबत तिनं भाष्य केलं आहे. (Photo Instagram) 6 / 9लोकसत्ताला दिलेल्या मुलाखती जिनिलिया म्हणाली, ''गेल्या दहा वर्षांपासून मी गृहिणी आहे. माझी मुलं, रितेश आणि त्याची आई यांच्याबरोबर मी आहे. हे लोकचं माझं आयुष्य आहेत.'' (Photo Instagram) 7 / 9मी गृहिणी आहे याबाबत मला कमीपणा वाईट नाही. मी यात आनंदी आहे. माझं आयुष्य माझं घर आहे.'' महाराष्ट्राची सून म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. (Photo Instagram) 8 / 9रितेश जिनिलियाने ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न केले. आता त्यांना दोन मुले आहेत. देशमुख घराण्याची सून झालेल्या जिनिलिया चांगलं मराठी बोलते. (फोटो इन्स्टाग्राम)9 / 9जिनिलियाने रितेशी लग्न केल्यानंतर महाराष्ट्रीयन संस्कृतीला आपलं केलं. अनेक सर्वाजनिक कार्यक्रमात आपण तिला महाराष्ट्रीय पेहरावात पाहिलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications