रेल्वेसमोर उडी तर कधी कॉपर सल्फेट खाऊन प्रसिद्ध अभिनेत्रीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 11:36 AM1 / 8बॉलिवूड कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असतं. त्यांच्या आयुष्यातील असेही काही किस्से असतात जे बऱ्याच जणांना माहितही नसतात. अनेकदा हे किस्से धक्कादायकही असतात. त्यांनी कितीही वैयक्तिक आयुष्य जपण्याचा प्रयत्न केला तरी ते इतरांसमोर येतंच.2 / 8ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी (Shabana Azmi) यांच्या आयुष्यातील असे काही धक्कादायक किस्से आहेत जे आपण कधीही ऐकले नसतील. शबाना आजमी यांना आपण अतिशय प्रभावी अभिनेत्री म्हणून ओळखतो. ७० च्या दशकात त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांची जोडी गाजली होती.3 / 8शबाना आजमी यांच्या आई शौकत आजमी (Shaukat Azmi) यांनी आपल्या आत्मचरित्रात मुलीबद्दल काही धक्कादायक खुलासे केलेत. 'कैफ अँड आय मेमॉयर' असं त्यांच्या आत्मचरित्राचं नाव. शौकत आजमी स्वत: अभिनेत्री होत्या. त्यांनी 'सलाम बॉम्बे' आणि 'उमराव जान' सारख्या सिनेमात भूमिका साकारली आहे.4 / 8शबाना आजमी यांनी लहानपणी दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता असा खुलासा शौकत आजमी यांनी आत्मचरित्रात केला आहे. त्यांनी लिहिले की, 'शबानाला वाटायचं की मी माझ्या मुलावर तिच्यापेक्षा जास्त प्रेम करते. त्यात तथ्यही होतंच कारण बाबाच्या जन्मानंतर मुलाची इच्छा पूर्ण झाली होती. 5 / 8एकदा सकाळी मी ९ वर्षांच्या शबाना आणि ६ वर्षांच्या बाबासाठी नाश्ता करत होते. यावेळी मी शबानाचा नाश्ता तिच्या भावाला दिला कारण तिला शाळेत जायला वेळ होता. मात्र शबानाला राग आला आणि ती टेबलवरुन उठून थेट शाळेत गेली. शबानाने शाळेतील प्रयोगशाळेत जात कॉपर सल्फेट खाल्लं होतं. नशिबाने शाळेच्या शिपायाने पाहिलं आणि तिला वाचवलं.6 / 8शबानाची मैत्रिण परनाने मला सांगितलं की तुम्ही शबानापेक्षा जास्त तिच्या भावावर प्रेम करता, म्हणून तिला आत्महत्या करायची आहे. हे ऐकून मी दु:खी झाले होते. शबानाने लहानपणीच दुसऱ्या वेळाही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.7 / 8मी शबानाला तिच्या वाईट वर्तवणुकीमुळे रागात घर सोडायला सांगितलं होतं. नंतर तिने ग्रांट रोड रेल्वे स्टेशनवर ट्रेनसमोर उडी मारत जीव देण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही तेथील एका व्यक्तीने तिचे प्राण वाचवले. शबाना लहानपणापासूनच उग्र स्वभावाची होती. अशा घटनांनंतर मी तिच्याशी बोलताना विचार करुनच बोलायला लागले.8 / 8शबाना यांनी लहानपणीपासूनच कुटुंबाला हातभार लावला होता. कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्याआधी ती ब्रू कॉफी विकायची. याचे तिला दरदिवशी ३० रुपये मिळायचे. हे शौकत यांना कधी समजलं नाही. पण जेव्हा शबाना यांनी तीन महिन्याचे पैसे एकदम आणून ठेवले तेव्हा याचा खुलासा झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications