Join us  

Vicky Katrina Wedding Anniversary : 'विकी कॅटरिना'च्या लग्नाला १ वर्ष पूर्ण; राजस्थानच्या शाही पॅलेसमध्ये झाला होता विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 11:08 AM

1 / 8
९ डिसेंबर २०२१ ला विकी कॅटरिनाने राजस्थान येथे डेस्टिनेशन वेडिंग केले. अगदी मोजक्या पाहुण्यांसह हा शाही विवाहसोहळा पार पडला.
2 / 8
राजस्थानसारख्या सुंदर, ऐतिहासिक ठिकाणी सवाई माधोपुरमध्ये सिक्स सेन्सेस किला बरवारा येथे त्यांनी लग्न केले.
3 / 8
तीन दिवसांच्या या विवाहसोहळ्यात हळद, मेहेंदी, संगीत असे सर्व फंक्शन होते. या सोहळ्याचे फोटोही प्रायव्हेट ठेवण्यात आले होते.
4 / 8
लग्नानंतर कॅटरिनाने पहिल्यांदा विकी साठी शिरा बनवला होता त्याचे फोटो शेअर केले होते.
5 / 8
लग्नानंतर त्यांचे सिक्स सेन्सेस फोर्ट येथे सूर्यप्रकाशात केलेले फोटोशुट खुप व्हायरल झाले. अतिशय राजेशाही थाटात त्यांचे हे फोटोशुट होते.
6 / 8
कॅटरिनाने लग्नात सब्यसाचीने डिझाईन केलेला लहंगा घातला होता. लाल रंगाच्या लहंग्यामध्ये कॅटरिना खुपच सुंदर दिसत होती.
7 / 8
विकीचा लुकही खुप फ्रेश होता. गुलाबी रंगाचा फेटा, ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी असा विकीचा लुक होता
8 / 8
बघता बघता आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
टॅग्स :लग्नविकी कौशलकतरिना कैफ