Join us  

विकी कौशलचा 'गोविंद नाम मेरा' चित्रपट थिएटरमध्ये नाही तर OTTवर होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 7:37 PM

1 / 6
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांचा कॉमेडी चित्रपट 'गोविंद नाम मेरा' OTT वर प्रदर्शित होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विकी करण जोहरसोबत 'गोविंद नाम मेरा' चित्रपटाबाबत संवाद साधत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
'गोविंदा नाम मेरा'मध्ये विकी कौशल एका डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. भूमी पेडणेकर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
या चित्रपटात विकीच्या मैत्रिणीची भूमिकाही कियारा अडवाणी साकारताना दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेला हा चित्रपट लवकरच 'डिस्ने प्लस हॉटस्टार'वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
'भूत पार्ट वन: द हॉन्टेड शिप' चित्रपटानंतर 'गोविंदा नाम मेरा' हा धर्मा प्रोडक्शन बॅनरखाली विकीचा दुसरा चित्रपट आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :विकी कौशलकियारा अडवाणीभूमी पेडणेकर