Join us  

विकी कौशलचा 'सॅम बहादूर' या दिवशी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 5:43 PM

1 / 6
गोविंदा नाम मेरा' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असलेला विकी कौशल आणखी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. (फोटो क्रेडिट- Instagram)
2 / 6
'सॅम बहादूर' या चित्रपटात तो सॅम माणेकशॅा यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. (फोटो क्रेडिट- Youtube)
3 / 6
रॉनी स्क्रूवाला निर्मित, मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट पुढल्या वर्षी १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. (फोटो क्रेडिट- Instagram)
4 / 6
या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लूची व्यक्तिरेखा सान्या मल्होत्रा साकारणार असून, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत फातिमा सना शेख दिसणार आहे. (फोटो क्रेडिट- Youtube)
5 / 6
निर्मात्यांनी एक वर्ष अगोदर तारीख जाहीर केल्यानं प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार आहे. (फोटो क्रेडिट- Instagram)
6 / 6
सॅम माणेकशॉ यांच्या लष्करी कारकिर्दीत चार दशकं आणि पाच युद्धांचा समावेश आहे. फील्ड मार्शल पदावर बढती मिळालेले ते पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते. १९७१ च्या भारत-पाक युद्धात त्यांच्या लष्करी विजयामुळं बांगलादेशची निर्मिती झाली. (फोटो क्रेडिट- Instagram)
टॅग्स :विकी कौशल