३ वर्षांची झाली विरुष्काची लेक वामिका, तुम्हाला माहितीये का तिच्या नावाचा अर्थ? By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:33 AM1 / 11अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. त्यांच्याकडे एक आदर्श कपल म्हणूनही पाहिलं जातं. 2 / 11अनुष्का-विराटने २०१७ साली विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर ४ वर्षांनी विरुष्काने चाहत्यांना गुडन्यूज दिली. 3 / 11११ जानेवारी २०२१ रोजी अनुष्काने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. लाडक्या लेकीबरोबरचे फोटो विरुष्का शेअर करताना दिसतात. 4 / 11मात्र अद्याप विराट आणि अनुष्काने त्यांच्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही. मीडियापासून विरुष्का त्यांच्या लेकीला दूर ठेवणं पसंत करतात. 5 / 11विराट-अनुष्काची लेक नक्की कशी दिसते? याबाबत त्यांच्या चाहत्यांनाही उत्सुकता आहे. 6 / 11काही दिवसांपूर्वीच विरुष्काच्या लेकीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ती पाठमोरी डान्स करताना दिसत होती. 7 / 11विराट आणि अनुष्काच्या लग्नानंतर 'विरुष्का' हा हॅशटॅग प्रचंड व्हायरल झाला होता. 8 / 11त्यामुळे आपल्या लेकीचं नावही ते विरुष्का ठेवतील, अशी चर्चा सुरू होती. 9 / 11पण, विरुष्काने त्यांच्या लाडक्या परीसाठी खास नावाची निवड केली होती. विराट-अनुष्काने लेकीचं नाव 'वामिका' ठेवलं आहे. 10 / 11विराटने त्याच्या लेकीच्या नावाचा अर्थही सांगितला होता. वामिका हे दुर्गा देवीचं दुसरं नाव असल्याचं तो म्हणाला होता. 11 / 11वामिका आता ३ वर्षांची झाली आहे. आज वामिका तिचा तिसरा वाढदिवस साजरा करणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications