Join us

'आश्रम' फेम बबिता भाभीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? 'बेबी बंप' फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:06 IST

1 / 8
'आश्रम' वेबसीरिजमधून बबिता भाभी या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री त्रिधा चौधरी(Tridha Choudhary). सीरिजमध्ये तिने दिलेले इंटिमेट सीन्सही खूप गाजले.
2 / 8
त्रिधा चौधरी त्याआधी 'दहलीज' या हिंदी मालिकेतही दिसली होती. यात तिने साकारलेली वकीलाची भूमिका सर्वांनाच आवडली होती.
3 / 8
त्रिधाने नुकताच एक फोटो शेअर केला ज्यावरुन चर्चा सुरु झाल्या आहेत. ती खऱ्या आयुष्यात सिंगल असूनही तिने बेबी बंपसोबत फोटो पोस्ट केला.
4 / 8
हाच तो फोटो जो तिने स्टोरीवर शेअर केला होता. 'माझ्याकडे एक बातमी आहे' असं कॅप्शनही तिने दिलं.
5 / 8
त्रिधा लग्नाआधीच प्रेग्नंट आहे? अशी चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावर बबिता भाभी प्रेग्नंट असल्याच्या बातम्या पसरल्या.
6 / 8
मात्र हा फोटो तिने १ एप्रिल रोजी शेअर केला आहे. याचाच अर्थ तिने चाहत्यांना 'एप्रिल फूल' बनवलं आहे असा अंदाज आता सर्वांनी लावला आहे.
7 / 8
३१ वर्षीय त्रिधा चौधरीचा कोलकातामध्ये जन्म झाला. ती हिंदीसह बंगाली आणि तेलुगू प्रोजेक्ट्समध्येही झळकली आहे. २०१३ साली तिने 'मिशवर रोहोश्यो' मधून अभिनयाला सुरुवात केली.
8 / 8
बबिता भाभी उर्फ त्रिधा चौधरी तिच्या हॉटनेसमुळेही चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो व्हायरल होतात.
टॅग्स :सेलिब्रिटीप्रेग्नंसीसोशल मीडियाटिव्ही कलाकारआश्रम चॅप्टर २