Join us

"सीन संपल्यावर बॉबीसोबत बोलायचेच नाही", पम्मी पहलवानचा खुलासा; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:07 IST

1 / 10
ओटीटी विश्वात 'आश्रम' (Aashram) वेबसीरिजने सर्वांनाच खिळवून ठेवलं. हटके स्टोरी, उत्तम अभिनय यामुळे सीरिज प्रचंड गाजली. नुकताच 'आश्रम'चा तिसरा सीझन आला.
2 / 10
बॉबी देओलने सीरिजमध्ये बाबा निरालाची भूमिका साकारली. ही सीरिज म्हणजे बॉबी देओलचं इंडस्ट्रीत झालेलं कमबॅकच आहे. सीरिजमधून अभिनेत्री अदिती पोहनकरनेही लक्ष वेधून घेतलं. तिने पम्मी हे पात्र साकारलं आहे.
3 / 10
बाबा निराला आणि पम्मीचे सीरिजमध्ये इंटिमेट सीन्सही आहेत. पम्मी बाबा निरालावर बलात्काराचे आरोप लावते. सीन संपल्यावर बॉबीसोबत कसा बाँड होता याचा खुलासा नुकताच अदितीने केला आहे.
4 / 10
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अदिती म्हणाली, 'सीन संपल्यावरही पम्मीची भूमिका माझ्यासोबत कायम राहायची. ऑफस्क्रीन सगळेच बॉबी सरांच्या किंवा भोपा स्वामी म्हणजेच चंदनच्या खोलीत वेळ घालवायचे. पण मी खूप कमी वेळा जायचे.'
5 / 10
'कारण मला फार विचित्र वाटायचं. म्हणजे मी स्क्रीनवर अशी भूमिका साकारतेय ज्यात मी बाबा निरालावर आरोप करतेय आणि दुसऱ्या क्षणी मी त्यांच्यासोबत वेळ घालवते. हे कसं वाटेल? असं माझ्या मनात यायचं.'
6 / 10
'एका पॉइंटनंतर मी स्वत:ला समजावलं की तो सीन संपला आहे. आता रिलॅक्स हो. मला यासाठी थोडा वेळ लागला. सुरुवातीचे १० दिवस लागले. मग एकदा आम्ही मित्र झालो आणि सगळं नॉर्मल झालं.'
7 / 10
'बाबा आणि पम्मी संध्याकाळी मस्त चिल करत आहेत असं ते चित्र झालं. पण आम्ही रात्री १० पर्यंतच एकत्र असायचो. कारण दुसऱ्या दिवशी पहाटे ४-५ वाजताच उठावं लागायचं. दिग्दर्शक प्रकाश झा नेहमी थंडीत पहाटेच शूट सुरु करायचे. आम्ही सगळे सीन्स वेळेत न थकता पूर्ण करायचो.'
8 / 10
'काम करताना मी बॉबी सरांची वेगळी बाजू पाहिली. ते खऱ्या खूप निरागस आहेत. अगदी लहान मुलांसारखे आहेत. त्यांनी त्यांच्या बायकोसोबत बसून अख्खी सीरिज पाहिली. मला फोन करुन त्यांनी माझं कौतुक केलं.'
9 / 10
'हा सीझन सगळा तुझ्यावरच होता. तू खरोखर चांगलं काम केलंस. नाहीतर सीझन आपटला असता. सीरिज पाहिल्यावर कौतुक करणारे ते पहिले व्यक्ती होते.'
10 / 10
अदितीची SHE ही सीरिजही खूप गाजली आहे. शिवाय तिने 'लय भारी' या रितेश देशमुखच्या मराठी सिनेमातही काम केलं. 'आश्रम'च्या यशानंतर आता अदितीच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉबी देओलवेबसीरिज