सिनेमात कधी बहीण, कधी आई; आता अभिनेत्री पन्नाशीत हिरोईन बनून ओटीटीवर करतेय बक्कळ कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 04:13 PM2024-03-06T16:13:58+5:302024-03-06T16:49:10+5:30

ओटीटीमुळे नशीबच बदललं, अभिनेत्रीला वयाच्या 50 व्या वर्षी मिळताएत लीड हिरोईनच्या भूमिका

मनोरंजनविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना उशिरा वाहवाही मिळाली आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांना त्यामुळे संधीच मिळू शकली नाही. सहाय्यक अभिनेत्री म्हणूनच त्यांना लोकप्रियता मिळाली.

कधी आई, कधी बहीण तर कधी पत्नी अशाच भूमिकांमध्ये दिसलेली ही अभिनेत्री सध्या ओटीटी पडदा गाजवत आहे. मोठ्या पडद्यावर सहाय्यक भूमिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री आता वयाच्या 50 व्या वर्षी लीड रोल साकारत आहे.

ही अभिनेत्री आहे शेफाली शाह(Shefali Shah). शेफाली गेल्या २९ वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. 'रंगीला' हा तिचा पहिला सिनेमा. यामध्ये आमिर खान आणि उर्मिला मातोंडकरसोबत शेफालीही झळकली.

रंगीला नंतर तिला मनोज वाजपेयीच्या 'सत्या' या सुपरहिट सिनेमात पाहिले गेले. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. शेफालीने 'वक्त', 'कार्तिक कॉलिंग कार्तिक', दिल धडकने दो','ब्रदर्स', 'कमांडो 2' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं.

शेफालीने भलेही अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारली असली तरी तिला स्वतंत्र असं यश, लोकप्रियता मिळाली नव्हती. कायम दुय्यम भूमिकेत दिसल्याने तिला तशाच भूमिका मिळत गेल्या.

अखेर ओटीटी माध्यमात आल्याने तिचं नशीबच पालटलं. शेफालीला केवळ मुख्य अभिनेत्री म्हणून नाही तर दमदार कहाणी असलेल्या स्क्रीप्ट मिळाल्या. 2019 मध्ये ओटीटीवर आलेल्या 'दिल्ली क्राईम' या सीरिजने तिला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली. तिच्या दमदार अभिनयाचं कौतुक झालं.

'दिल्ली क्राईम' मध्ये शेफालीने डीसीपी वर्तिका चतुर्वेदीची भूमिका उत्तम निभावली. या सीरिजमुळे शेफालीच्या चाहतावर्गात मोठी वाढ झाली.

यानंतर शेफालीने 'जलसा', 'डार्लिंग्स' 'ह्युमन' या सिनेमा, सीरिजमध्ये काम केले. 'अजीब दास्तांस' या ओटीटीवर रिलीज झालेल्या सिनेमातही तिची आणि मानव कौलची केमिस्ट्री अप्रतिम होती.

तसेच काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेली 'थ्री ऑफ अस' ही फिल्मही अगदी हलकीफुलकी आहे. ओटीटीवरच रिलीज झालेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या आणि क्रिटिक्सच्या कौतुकास पात्र ठरला.