Join us

१३ वर्षीय मुलाला खून केल्यामुळे झाली अटक; मग पुढे..? चार भागांच्या 'या' वेबसीरिजची जगात चर्चा

By देवेंद्र जाधव | Updated: March 19, 2025 15:51 IST

1 / 7
सध्या जगभरात एका वेबसीरिजची चांगलीच चर्चा आहे. मराठीतील हेमंत ढोमेपासून हिंदीतील अनुराग कश्यपपर्यंत सर्वांनी ही वेबसीरिज सिनेप्रेमींना बघायला सांगितली आहे.
2 / 7
या हॉलिवूड वेबसीरिजचं नाव आहे Adolescence. वेबसीरिजची सध्या जगात चर्चा असून प्रेक्षक-समीक्षकांनी या सीरिजचं चांगलंच कौतुक केलं आहे.
3 / 7
Adolescence वेबसीरिजची कथा सांगायची तर एका १३ वर्षीय मुलाला त्याच्या वर्गमित्राचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक होते. मग पुढे पोलीस हत्येचा तपास करायला सुरुवात करतात.
4 / 7
अल्पवयीन मुलाने केलेल्या हत्येचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक गोष्टींचा उलगडा होतो. पुढे अल्पवयीन मुलगा खरंच दोषी आहे का, याचं उत्तर वेबसीरिज पाहूनच कळेल
5 / 7
केवळ ४ भागांची ही वेबसीरिज सध्या नेटफ्लिक्सवर चांगलीच ट्रेंडींग आहे. या वेबसीरिजमधील सर्व प्रमुख कलाकारांच्या अभिनयाचंही चांगलंच कौतुक होतंय.
6 / 7
ज्या प्रेक्षकांना क्राईम थ्रिलर वेबसीरिज बघण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी Adolescence ही वेबसीरिज मस्ट वॉच आहे.
7 / 7
Adolescence ही वेबसीरिज खऱ्या घटनेवर आधारीत आहे. परंतु मेकर्सने मात्र या गोष्टीला दुजोरा दिला नाही. बॉलिवूडपासून मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींंनी नावाजलेली ही वेबसीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर बघू शकता.
टॅग्स :वेबसीरिजहॉलिवूड