Join us

"दादर स्थानकावर महिलांच्या डब्यात त्याने माझ्या..."; मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 12:46 IST

1 / 9
महिला अत्याचाराच्या घटना दुर्दैवाने सतत कानावर येत असतात. फक्त सामान्य महिलाच नाही तर अगदी सेलिब्रिटीही कधी ना कधी या घटनांना सामोऱ्या गेल्या आहेत.
2 / 9
'लय भारी' या मराठी सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली तसंच 'आश्रम', 'she' या सीरिजमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अदिती पोहनकरने (Aditi Pohankar) नुकताच तिला आलेला भयानक अनुभव सांगितला.
3 / 9
'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, 'लोकल मधून प्रवास करताना मी फर्स्ट क्लास डब्यात चढले. महिलांच्या फर्स्ट क्लासमध्ये छोट्या शाळकरी मुलांनी आलेलं चालतं. तर काही लहान मुलंही डब्यात चढली.'
4 / 9
'मी तेव्हा ११ वीत असेन. माझ्यासमोर डब्यात एक मुलगा उभा होता. दादरवरुन जशी ट्रेन निघाली त्याने माझ्या छातीला हात लावला. भर दिवसा ११ वाजताची ही घटना आहे.'
5 / 9
'मी तेव्हा कुर्ता घातला होता. त्यामुळे मी काही अशा तशा कपड्यातही नव्हते. समोरच्या मुलाचा असा काही हेतू असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मला धक्काच बसला.'
6 / 9
'मी पुढच्या स्टेशनला उतरले आणि पोलिस स्थानकात गेले. तर तिथे पोलिसांची प्रतिक्रिया शॉकिंग होती. 'काही झालं नाही ना तुम्हाला, आता कुठे त्याला शोधणार?' असं ते म्हणाले.
7 / 9
'पोलिस स्टेशनजवळच मला तो मुलगा परत दिसला जो दुसऱ्या मुलीसोबत हेच करणार होता. मी त्याला ओळखलं. मी पोलिसांना म्हटलं हा तोच आहे. पोलिसांनी मला पुरावा मागितला. मी म्हटलं, 'पुरावा कशाला हवा? त्याने माझ्यासोबत केलंय मला माहित असणारच ना'.
8 / 9
'मग एक महिला पोलिस कॉन्स्टेबल माझ्यासोबत आली. तिने त्या मुलाला जाब विचारला. तर त्या मुलाने आपण असं काही केलं नाही म्हणत नकार दिला. तेव्हा मी तिथेच माझ्यात दुर्गा संचारल्यासारखी त्याच्यावर जोरात ओरडले. माझा आवाज ऐकून तो घाबरला आणि लगेच 'हो हो, मी केलं' असं म्हणाला.'
9 / 9
'मी त्याची कॉलर पकडली आणि 'परत कोणासोबत करशील?' असं विचारलं. त्याला पोलिसांकडे दिलं. मी त्याच्यावर ओरडले नसते तर त्याने मान्यच केलं नसतं.'
टॅग्स :मराठी अभिनेतालैंगिक छळवेबसीरिजमुंबई