Join us

'रानबाजार'नंतर प्राजक्ताचा पुन्हा मराठमोळा साजशृंगार; पांढऱ्या रंगाच्या hand painted साडीत शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 12:41 PM

1 / 11
मराठी कलाविश्वातील गुणी, सोज्वळ अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत आहे.
2 / 11
अलिकडेच प्राजक्ताची मुख्य भूमिका असलेली रानबाजार ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजमध्ये तिच्यासह अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही स्क्रीन शेअर केली आहे.
3 / 11
कायम आदर्श सून, मुलगी अशाच भूमिका साकारणारी प्राजक्ता या सीरिजमध्ये पहिल्यांदाच बोल्ड अंदाजात प्रेक्षकांसमोर आली त्यामुळे अनेकांना धक्का बसला.
4 / 11
ही सीरिज पाहिल्यावर अनेकांनी प्राजक्ताच्या भूमिकेवर संमिश्र प्रतिक्रिया दिली. परंतु, आता प्राजक्ता पुन्हा एकदा तिच्या जुन्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे.
5 / 11
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
6 / 11
या फोटोमध्ये प्राजक्ताने पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून ही संपूर्ण साडी hand painted आहे. यावर छान पेंटिंग करण्यात आली आहे.
7 / 11
'कथकली…नाही नाही.. मी भरतनाट्यम् नर्तिका… @manaa_creations यांनी ही hand painted साडी गिफ्ट दिली; त्यामुळे हे चित्र flaunt करतेय… खूप सुंदर paintings असलेल्या खूप साड्या आहेत त्यांच्याकडे…', असं कॅप्शन देत प्राजक्ताने साडीतील फोटो शेअर केले आहेत.
8 / 11
सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत असून त्याच्यावर कमेंट व लाइक्सचा पाऊस पडत आहे.
9 / 11
या फोटोमध्ये तिने तिची संपूर्ण साडीवरील डिझाइन फ्लॉण्ट केली आहे.
10 / 11
प्राजक्ताला जुन्या अंदाजात पाहून नेटकरी पुन्हा सैराट झाले आहेत.
11 / 11
प्राजक्ताची साडी ज्या डिझायनरने डिझाइन केली तिच्यासोबतही तिने खास फोटो शेअर केला आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळीरानबाजार वेबसीरिजसेलिब्रिटी