सध्या काय करतेय 'पक पक पकाक'मधील साळूचे पात्र साकारणारी अभिनेत्री ?, जाणून घ्या तिच्याबद्दल By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 7:00 AM1 / 9पक पक पकाक हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील भुत्या नाना पाटेकर यांनी साकारला होता तर चित्रपटात साळूचे पात्र साकारले होते अभिनेत्री नारायणी शास्त्रीने. 2 / 9नारायणी शास्त्री ही हिंदी टीव्ही अभिनेत्री आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते.3 / 9 १६ एप्रिल १९७४ रोजी तिचा पुण्यात जन्म झाला. पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतल्यावर तिने मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. 4 / 9तिथेच अभिनयाचे वेध लागले आणि “क्युंकी सांस भी कभी बहू थी” या लोकप्रिय मालिकेत केसरची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तिची ही भूमिका खूप गाजल्यानंतर अनेक हिंदी मालिकेत तिला महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या.5 / 9 कुसुम, पिया का घर, नमक हराम, रिषतों का चक्रव्यूह, फिर सुबह होगी, लाल ईश्क अशा अनेक टीव्ही मालिकेतून तिने आपले अढळ स्थान निर्माण केले. 6 / 9हिंदी मालिकेत काम करत असली तरी मराठी ही भाषाही तिला चांगलीच अवगत होती. 7 / 9पक पक पकाक नंतर ऋण या आणखी एका मराठी चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारल्या. घात, चांदणी बार, मुंबई मेरी जान, न घर के ना घाट के या बॉलिवूड चित्रपटात देखील तिने छोट्या मोठ्या भूमिका बजावल्या आहेत.8 / 9 २०१५ साली तिने परदेशी बॉयफ्रेंड असलेल्या ‘स्टीवन ग्रेवर’ सोबत गुपचूप लग्नाची गाठ बांधली. याबाबत तिने बरेच दिवस कुठेही वाच्यता केली नव्हती. ‘ मी माझे लग्न जगजाहीर करणार नव्हते, माझे त्याच्यासोबत प्रेम होते आणि म्हणूनच मी लग्न केले’ असे म्हणून तिने मीडियाला गप्प केले होते.9 / 9 आता सध्या ती आपल्या पतीसोबत मुंबईतच स्थायिक झाली आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘नजर’ आणि ‘संगिनी’ या मालिकेत काम करताना दिसली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications