असं काय बिनसलं की, आमिरने किरण रावसोबतचा 15 वर्षांचा संसार मोडला?, अभिनेत्याने सांगितलं 'सत्य' By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 2:18 PM1 / 9बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांनी जुलै 2021 मध्ये एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 9लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा कपलचा हा निर्णय चाहत्यांसाठीही धक्कादायक होता. मुळात आमिर व किरणने हा निर्णय का घेतला? हे कळायला मार्ग नव्हता. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 9असं काय बिनसलं की, दोघांनी इतका टोकाचा निर्णय घ्यावा? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्यानंतर खुद्द आमिरने या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 9‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खानने यावर खुलासा केला होता. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 9किरणला घटस्फोट देण्याच्या निर्णय का घेतला? असं विचारलं असता तो म्हणाला,‘ फॅमिली म्हणून आपण काही चर्चा करत असलो तरी, तू वेगळ्याच विचारात मग्न असतो, असं किरण मला म्हणायची. तू वेगळाच माणूस आहेस, असं ती मला नेहमी म्हणायची. पण तू आहेस तसाच राहा. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 9तू बदलावं अशी माझी इच्छा नाही. कारण तू बदलास तर मी ज्याच्यावर प्रेम केलं तो तू राहणार नाहीस, असंही ती मोठ्या प्रेमानं म्हणायची. सात वर्षांपूर्वी किरणने म्हटलेल्या या गोष्टींबद्दल आज मी विचार करतो तेव्हा गेल्या 6-7 महिन्यांत माझ्या स्वत:मध्येच अनेक बदल झाल्याचं मला जाणवतं.’(फोटो इन्स्टाग्राम)7 / 9किरणजी व मी एकमेकांवर खूप प्रेम करतो. आमच्या मनात एकमेकांबद्दल अपार आदर व प्रेम आहे. लोकांना आमचं नातं कधीच कळणार नाही. ते कधीच समजू शकणार नाहीत. आमचा घटस्फोट अन्य रिलेशनशिपमुळे झालेला नाही, असंही त्याने त्यावेळी स्पष्ट केलं होतं. (फोटो इन्स्टाग्राम)8 / 9आज भलेही आमच्या नात्याचे संदर्भ बदलले आहेत. पण आजही आम्ही एकमेकांसोबत आहोत. एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. एकमेकांसोबत काम करत आहोत. आम्ही आजही एकमेकांच्या कुटुंबाचे सदस्य आहोत.(फोटो इन्स्टाग्राम)9 / 9 पती-पत्नी म्हणून आमचं नातं बदललं आहे. आम्ही लग्नासारख्या पवित्र बंधनाला आदर देऊ इच्छित होतो. पण आम्ही एकत्र काम करत आहोत. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो, किरणजी त्याच बिल्डिंगच्या वरच्या फ्लोरवर राहतेय, असंही आमिर म्हणाला होता. (फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications