नेहा कक्कर ते जुबिन नौटियालपर्यंत, बॉलिवूडचे हे टॉप गायक किती घेतात एका गाण्यासाठी मानधन? By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 3:29 PM1 / 9Bollywood Singer's : एका सिनेमात अनेक महत्वाचे भाग असतात. त्यातीलच एक म्हणजे सिनेमातील गाणी. भारतीय सिनेमातील गाणी सिनेमाचा आत्मा असतात. जर सिनेमातील गाणी चांगली असली तर सिनेमाही हिट होतो. सोबतच गाणी ऐकून तुमचा मूडही ठीक होतो. त्यात जर गाणी तुमच्या आवडत्या गायकाने गायलेली असेल तर सोने पे सुहागा असं काम होतं. सिनेमातील गाण्यात गायकांची लोकप्रियताही महत्वाची ठरते. त्यामुळेच बॉलिवूड अभिनेत्यांप्रमाणे गायकही मोठं मानधन घेतात. ते किती असतं हे तुम्हाला आज सांगणार आहोत.2 / 9१) जुबिन नौटियाल - जुबिन नौटियाल अलिकडे सर्वात जास्त लोकप्रिय असलेला गायक आहे. त्याने एकापाठी एक सुपरहिट गाणी दिली आहेत. इतकंच काय तर तो म्युझिक व्हिडीओमध्येही दिसत आहे. अशात आज तो बॉलिवूडच्या सर्वात टॉपच्या गायकांमध्ये आहे. त्यामुळे अर्थातच त्याचं मानधनही जास्त असणार. मीडिया रिपोर्टनुसार, जुबिन एका गाण्यासाठी १५ लाख रूपये मानधन घेत असल्याचं समजलं.3 / 9२) नेहा कक्कर - नेहा कक्करचा तर आवाज आज घराघरात पोहोचला आहे. तिची गाणी प्रत्येक इव्हेंट्सची शान आहे. सिनेमातील असो वा म्युझिक व्हिडीओतील सगळी गाणी हिट होतात. ती सध्याची सर्वात लोकप्रिय गायिका आहे. त्यामुळे नेहा एका गाण्यासाठी १० ते १५ लाख रूपये चार्ज करते.4 / 9३) अरिजीत सिंह - अरिजीत सिंहचा आवाज तर आज प्रत्येक मनात आहे. त्याची गाणी किती सुपरहिट आहेत हे काही कुणाला सांगायला नको. त्याचा आवाज अनेकांच्या मनाला भिडतो. अरिजीत सिंह एका गाण्यासाठी १५ लाख रूपये घेतो.5 / 9४) बादशाह - बादशाह हा तसा रॅपर आहे. पंजाबी गाण्यांपासून त्याने सुरूवात केली होती. पण आज तो बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय रॅपरपैकी एक आहे. तरूणाईमध्ये त्याची मोठी क्रेझ बघायला मिळते. त्यामुळे त्याचं प्रत्येक गाणं सुपरहिट होतं. तो एका गाण्यासाठी २० लाख रूपये घेतो.6 / 9५) श्रेया घोषाल - दिवंगत लता मंगेशकर यांच्यानंतर बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. ती अनेक वर्षांपासून आपल्या मधूर आवाजाने श्रोत्यांचं मनोरंजन करत आहे. तिने सुपरहिट गाणी दिली आहेत. ती एका गाण्यासाठी २० ते २५ लाख रूपये घेते.7 / 9 ६) गुरू रंधावा - गुरू रंधावाही पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही की, गुरूने त्याच्या करिअरची सुरूवात केवळ ५०० रूपये फी पासून सुरू केली होती. आज तो एका गाण्यासाठी १५ लाख रूपये मानधन घेतो.8 / 9७) सुनीधी चौहान - सुनीधी चौहानला आज वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. तिचा आवाजच तिची खरी ओळख आहे. 'जिया रे', 'कमली कमली', 'धूम मचाले', 'शावा शावा' सहीत अनेक गाणी तिने हिट केली. ती एका गाण्यासाठी १० ते १५ लाख रूपये घेते.9 / 9८) सोनू निगम - सोनू निगम केवळ हिंदीच नाही तर बंगाली, तमिळ, तेलुगू, मराठी, भोजपुरी भाषांमध्येही गाणी गातो. त्याची एकूण संपत्ती ३५० कोटी रूपये आहे. सोबतच त्याने अनेक अल्बमही रिलीज केले आहेत. तोही एका गाण्यासाठी १० ते २० लाख रूपये घेतो. आणखी वाचा Subscribe to Notifications