Join us

जबरदस्त! सातवीत नापास, शेफ आणि वेटरचं केलं काम; आता आहे 2500 कोटींच्या संपत्तीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 5:53 PM

1 / 10
अभिनेता होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अशाच एका अभिनेत्याची सक्सेस स्टोरी समोर आली आहे. हा अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आहे.
2 / 10
अक्षय कुमार लहान असताना डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये होता, तिथे कराटे शिकू लागला. त्याला अभ्यासात रस नव्हता. त्याच्या एका मुलाखतीत त्याने खुलासा केला होता की तो सातवीत नापास झाला होता.
3 / 10
एएनआयशी बोलताना त्याने खुलासा केला की, तो सातवी नापास झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं होतं की, 'तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे? तेव्हा त्याने 'मला हिरो बनायचे आहे' असं उत्तर दिलं.
4 / 10
आपल्या बालपणाबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला, चांदनी चौकातील एकाच घरात आम्ही 24 जण राहत होतो. आम्ही सर्व एकाच खोलीत झोपायचो. सकाळी व्यायामासाठी उठायचो तेव्हा बाहेर पडण्यासाठी सगळे एकमेकांवर उड्या मारायचो. त्यावेळी घराचे भाडे 100 रुपये होते.
5 / 10
अक्षय कुमारने गुरु नानक खालसा कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली, पण अभ्यासात रस नसल्याने शिक्षण सोडलं. पुढे मार्शल आर्ट्समध्ये पुढे जाण्यासाठी तो वडिलांच्या मदतीने थायलंडला गेला. बँकॉकमध्ये पाच वर्षे घालवल्यानंतर तो थाय बॉक्सिंगमध्ये पारंगत झाला.
6 / 10
आधीच भारतातून तायक्वोंडोमध्ये ब्लॅक बेल्ट पटकवल्यानंतर त्याने बँकॉकमध्ये मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले, शेफ आणि वेटर म्हणून काम केलं. ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केलं, तर ढाका येथे हॉटेल शेफ म्हणून काम केलं.
7 / 10
दिल्लीत असताना त्याने कुंदनचे दागिने विकले आणि मुंबईत परतल्यावर त्याने मार्शल आर्ट शिकवण्यास सुरुवात केली. बंगळुरूमध्ये एका जाहिरातीच्या शूटसाठी जेव्हा अक्षय फ्लाइट चुकला तेव्हा त्याला मोठा ब्रेक मिळाला.
8 / 10
निराश होऊन, त्याने आपल्या पोर्टफोलिओसह एका फिल्म स्टुडिओला भेट दिली आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्याला निर्माता प्रमोद चक्रवर्ती यांनी साइन केलेल्या दीदार चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली.
9 / 10
इतक्या संघर्षानंतर अक्षय कुमार आता सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याच्याकडे मुंबईत 80 कोटी रुपयांचा आलिशान बंगला आहे. रिपोर्टनुसार, अक्षय कुमारची एकूण संपत्ती आता 2,500 कोटी रुपये आहे. त्यांची गोवा, कॅनडा आणि इतर ठिकाणी घरं आहेत.
10 / 10
टॅग्स :अक्षय कुमार