काही जण मैत्रीच्या नात्यापर्यंत ठीक असतात जीवनसाथी म्हणून नाही घटस्फोटोनंतर बिपाशा बासूचा पतीने सोडले मौन By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 2:18 PM1 / 13 काही जण त्यांचं कौतुक करतात तर अनेकजण त्यांच्या लग्नावरून त्यांना ट्रोलही करतात. 2 / 13विशेषतः तिसरं लग्न केल्याने करणसिंहला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. 3 / 13हे सगळं होत असताना अनेकांना करणसिंहने त्याची दुसरी पत्नी जेनिफर विंगेटशी काडीमोड का घेतला आणि बिपाशाशी लग्न का केलं हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. 4 / 13त्याने असं का केलं असा प्रश्न आजही अनेकांना पडतो. 5 / 13यावरून अनेक चर्चाही ऐकायला मिळतात. मात्र यावर इतके दिवस मौन बाळगणाऱ्या करणने पहिल्यांदाच आपलं मौन सोडले होते. 6 / 13‘बेहद’फेम अभिनेत्री जेनिफर विंगेटने यावर काही बोलण्याआधी करणने भूमिका मांडली होती.7 / 13 जेनिफरशी लग्न करणं ही आपली घोडचूक होती असं करणने एका मुलाखतीत म्हटलं होतं.8 / 13काही जण मैत्रीच्या नात्यापर्यंत ठीक असतात. त्यांचा जीवनसाथी म्हणून विचार होऊ नये असं सांगत जेनिफरशी केलेल्या लग्नाबाबत त्यानं पश्चाताप व्यक्त केला होता.9 / 13घाईघाईत निर्णय घेऊन आपण चूक केली होती, मात्र भविष्यात त्याची पुनरावृत्ती करणार नाही असंही तो या मुलाखतीत म्हणाला होता.10 / 13'करण आणि माझे कॉम्बिनेशन खूप चांगले जमले आहे. आमच्या चांगली मैत्रीसुद्धा झाली आहे. शूटिंगवेळी आम्ही दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला होता. तो खूप मेहनती आणि चांगला अभिनेता आहे.'11 / 13दोघांच्या आवडी-निवडी जुळल्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकले.12 / 13दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. 13 / 13त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात. आणखी वाचा Subscribe to Notifications