Join us

जेव्हा दीपिकाने रणबीरला कंडोम गिफ्ट करण्याची व्यक्त केली होती इच्छा, भडकले होते ऋषी कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 8:00 AM

1 / 8
रणबीर कपूर लवकरच आलिया भटशी लग्न करतोय. पण आलिया आधी रणबीरच्या आयुष्यात अनेकजणी येऊन गेल्यात. यापैकीचं एक होती दीपिका पादुकोण. रणबीरच्या प्रेमात दीपिका अक्षरश: वेडी होती. अगदी रणबीरच्या नावाचा टॅटूही तिने गोंदवला होता.
2 / 8
पण कालांतराने कुठे बिनसलं ठाऊक नाही, पण दीपिका व रणबीरचं ब्रेकअप झालं. अचानक रणबीरच्या आयुष्यात कतरिना कैफची एन्ट्री झाली आणि दीपिका आऊट झाली. रणबीरशी ब्रेकअप झाल्यावर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली होती. आतून कोलमडली होती. अनेकदा अनेक मुलाखतीत ती यावर बोलली आहे.
3 / 8
2010 मध्ये एका मुलाखतीत दीपिकाने रणबीरवर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. याचवर्षी दीपिका करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमध्ये आली होती. या शोमध्ये तिने रणबीरची चांगलीच खिल्ली उडवली होती.
4 / 8
होय, या चॅट शोमध्ये दीपिकासोबत सोनम कपूरही होती. तू एक्स बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरला काय गिफ्ट देशील? असा प्रश्न रॅपिड फायर राउंडमध्ये करणने दीपिकाला विचारला होता. करणच्या या प्रश्नावर दीपिकाने दिलेलं उत्तर ऐकून तेव्हा सगळेच अवाक् झाले होते.
5 / 8
मी रणबीरला कंडोम गिफ्ट करेल. कारण कंडोमचा सर्वात जास्त वापर रणबीरचं करतो. त्याला कंडोमचा वापर करायला खूप आवडतं. त्यामुळेच मला त्याला हीच गोष्ट भेट म्हणून द्यायला आवडेल, असं उत्तर दीपिकाने त्या प्रश्नावर दिलं होतं.
6 / 8
रणबीरला तिला कोणता सल्ला द्यावासा वाटतो, या प्रश्नावरही दीपिका असंच काही बोलली होती. त्याने एखाद्या चांगल्या ब्रँडच्या कंडोमचा प्रचार करावा. कंडोमविषयी तो खूप छान माहिती देऊ शकेल, असं ती म्हणाली होती. दीपिकाने दिलेलं उत्तर ऐकून करण चाट पडला होता. सोनम सुद्धा थक्क झाली होती.
7 / 8
हा किस्सा रणबीर कपूरपर्यंत पोहोचला तेव्हा, त्याने वेळ मारून नेली होती. लोकांना सुरक्षित सेक्सबद्दल कळावं यासाठी कंडोमचा प्रचार करायला हरकत नाही, असं तो म्हणाला होता. पण ऋषी कपूर मात्र जाम संतापले होते. दीपिकाने नॅशनल टीव्हीवर आपल्या लेकाची खिल्ली उडवावी, हे ऋषी कपूर यांना आवडलं नव्हतं.
8 / 8
हे म्हणजे द्राक्षं आंबट आहे, अशातला प्रकार आहे, असं म्हणत ऋषी कपूर यांनी दीपिकाला जोरदार टोला लगावला होता. अशा गोष्टी करण्यापेक्षा लोकांनी कामावर लक्ष द्यावं, असा सल्लाही त्यांनी दिला होता.
टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठरणबीर कपूरदीपिका पादुकोणबॉलिवूड