Join us

TVवरील सुभद्राने मोडला मैत्रिणीचा २२ वर्षांचा संसार; अन् तिच्याच पतीसोबत बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 13:38 IST

1 / 8
रामानंद सागर फक्त 'रामायण'साठीच लोकप्रिय नाहीत. त्यांनी मनोरंजन जगताला दमदार चित्रपट आणि मालिका दिल्या आहेत. त्यातीलच एक मालिका म्हणजे श्री कृष्ण. या मालिकेने १९९३ ते १९९७ पर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ही मालिका प्रेक्षकांमध्ये जेवढी लोकप्रिय होती तेवढीच त्यातील पात्रांनीही लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील सुभद्राचे पात्रदेखील खूप चर्चेत आले होते. ही भूमिका अभिनेत्री सोनिया कपूरने साकारली होती. तिने हिमेश रेशमियासोबत लग्न केले आहे.
2 / 8
अभिनेत्री सोनिया कपूर फक्त प्रोफेशनल लाइफमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळेही खूप चर्चेत आली होती. ती खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. तसेच ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा पती हिमेशसोबतचे फोटो शेअर करत असते.
3 / 8
सोनिया कपूरने २०१८ साली संगीतकार आणि गायिका हिमेश रेशमियासोबत लग्न केले होते. हे तिचे पहिले लग्न होते तर हिमेशचे दुसरे लग्न. सोनियाच्या आधी हिमेशचं लग्न कोमल नामक मुलीसोबत झाले होते.
4 / 8
हिमेशने कोमलसोबत लग्न केले होते तेव्हा तो फारसा चर्चेत नव्हता. त्या दोघांनी १९९५ साली लग्न केले होते. मात्र मग हिमेशच्या जीवनात सोनियाची एंट्री झाली आणि त्याने २०१७ साली कोमलसोबतचा २२ वर्षांचा संसार मोडला.
5 / 8
हे वाचून तुम्ही हैराण व्हाल की, हिमेश रेशमियाच्या जीवनात सोनियाची एंट्री कोमलमुळे झाली होती. खरेतर सोनिया कोमलची मैत्रिण होती. हिमेश आणि सोनियाचे कुटुंब एकाच इमारतीत राहत होते. यावेळी सोनिया अनेक मालिकेत झळकली होती आणि कोमलसोबतच्या मैत्रीमुळे ती हिमेशच्या नेहमी घरी जात होती.
6 / 8
कोमलनेच सोनियाला हिमेशला भेटवले होते. असे म्हटले जाते की, हिमेश आणि सोनियाने २००६मध्ये एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती. मात्र कोमललाच कधीच संशय आला नाही. त्या दोघांचं अफेयर सुरू होतं आणि कोमलला त्याचा अजिबात थांगपत्ता लागला नाही.
7 / 8
जेव्हा कोमलला ही गोष्ट समजली तेव्हा तिने हिमेशसोबत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हिमेश कोमलसोबत घटस्फोट घेतला आणि २०१८ मध्ये सोनियासोबत लग्न केले. मात्र हिमेश आणि कोमल दोघेही मिळून त्यांच्या मुलाची काळजी घेतात.
8 / 8
टॅग्स :हिमेश रेशमिया