'सैफसोबत लग्न करु नकोस तुझे करिअर बर्बाद होईल !'; करिना कपूरला दिला होता सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 1:37 PM1 / 8बॉलिवूडमधील कपल गोल म्हणून अभिनेता सैफ अली खान ( saif ali khan) आणि करीना कपूर खान (kareena kapoor khan) या जोडीकडे पाहिलं जातं. 2 / 8शाहिद कपूरसोबत ब्रेकअप केल्यानंतर करीनाने सैफला डेट करण्यास सुरुवात केली.बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर करीना आणि सैफ या जोडीने २०१२ मध्ये लग्न केलं. आज त्यांच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.3 / 8 विशेष म्हणजे आजदेखील या जोडीतलं प्रेम कायम असून त्यांच्यातील हे गोड नातं बऱ्याचदा दिसून येतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अभिनेत्रीच्या जवळच्यांना सैफ अली खान सोबत लग्न करत असल्याचे समजल्यावर त्यांनी अभिनेत्रीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला.4 / 8करीनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, लोकांनी तिला इतकेच सांगितले की सैफ घटस्फोटित आहे, दोन मुलांचा बाप आहे, तू खरंच सैफशी लग्न करणार आहेस का?5 / 8इतकंच नाही तर करीनाला काही लोकांनी असंही सांगितलं की सैफशी लग्न केल्याने तिचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं.6 / 8त्यानंतर करीनाने विचार केला की, प्रेम करणं हा खरंच इतका मोठा गुन्हा आहे का? लग्न झाल्यावर काय होते ते पाहूया.7 / 8मात्र, आज सैफ आणि करीना दोघेही इंडस्ट्रीतील पॉवर कपल्समध्ये गणले जातात.8 / 8सैफ आणि करीनाला दोन मुले आहेत, मोठ्या मुलाचे नाव तैमूर अली खान आहे, तर लहान मुलाचे नाव जहांगीर अली खान आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications